accident News Pudhari
नांदेड

Nanded Accident | मुखेड येथील मोटरसायकल अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी

उमरदरी शिवारात देगलूर–हिब्बट रोडवर भीषण मोटरसायकल अपघात

पुढारी वृत्तसेवा

मुखेड : मुखेड शहरालगत असलेल्या उमरदरी शिवारात देगलूर–हिब्बट रोडवर झालेल्या भीषण मोटरसायकल अपघातात एक युवक जागीच ठार झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.

मुखेड शहरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरदरी शिवारात तांदळीकडून मुखेडकडे येणाऱ्या मोटरसायकलचा अचानक अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलवरील आयान साजित शेख (रा. फुलेनगर, मुखेड) हा युवक जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला आरमान युसुफ पठाण (रा. फुलेनगर, मुखेड) हा युवक गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी युवक आरमान पठाण याला त्वरित मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश रायकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका पूजा वाघमारे, लखन पवार, कक्षा सेवक माऊली धनगे तसेच मेस्कोचे सुरक्षारक्षक अमर सूर्यवंशी, ऋषिकेश गुट्टे व हनुमंत नागरगोजे यांनी प्राथमिक उपचार केले.

आरमान पठाण याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची नोंद मुखेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघात नेमका कशामुळे झाला याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT