मुखेड: मुखेड शहराची वाढती लोकसंख्या व त्या अनुषंगाने झालेली वस्तीवाढ लक्षात घेता येथील डाकघर येथे किमान चार टपाल सेवकाची गरज आहे. मागील कित्येक वर्षापासुन केवळ दोन टपाल सेवकावर टपाल वाटपाची जबाबदारी आहे. त्यामुळे टपाल वाटपात होणारी दिरंगाई लक्षात घेता, येथील डाकघरासाठी नव्याने दोन कर्मचा-याची नियुक्ती करा अशी मागणी होत आहे.
मुखेड शहराची व्याप्ती 2 कि.मी. परिसरात असुन त्यात शाळा, काॅलेज, प्रशासकीय कार्यालयासह वाढीव वस्त्या व व्यापारी प्रतिष्ठाने यांचा समावेश असुन कार्यरत दोन टपाल कर्मचा-याना एका टोकापासुन दुस-या टोकापर्यत टपाल वाटपासाठी करावी लागत असते. त्यात अँमेझान, फ्लिपकार्ड, या खाजगी कंपन्याच्या आँनलाईन पार्सल वाटपाशी स्पर्धा करण्यासाठी डाकघरात आलेली पार्सल तातडीने ग्राहकांपर्यत पोहचव्यासाठी टपाल सेवकांना धावपळ करावी लागते. ही बाब लक्षात घेता टपाल वाटप निर्धारीत वेळेत करण्यासाठी नव्याने दोन टपाल सेवकाची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.
मुखेड डाकघरामार्फत दररोज 30 ते40 लाख रुपये वाटप होतात. त्यासाठी सकाळी 8 पासुन ग्राहकासाठी पैसे काढण्याची सोय केली असुन त्यासाठी ग्रामीण टपाल सेवकाची मदत घेतली जाते. नविन टपाल सेवक आल्यास ते ह्या कामी मदत करु शकतील व ग्रामीण टपाल सेवक आपली जबाबदारी पार पाडु शकेल, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे.