Accident  Pudhari
नांदेड

Naigaon accident: ट्रॅव्हल्स-दुचाकीची भीषण धडक; एक ठार, एक गंभीर जखमी

नरसी–मुखेड मार्गावर खंडगाव (बेंदी) पाटीजवळ ट्रॅव्हल्स (ट्रॅक्स) आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : तालुक्यातील नरसी–मुखेड मार्गावर खंडगाव (बेंदी) पाटीजवळ ट्रॅव्हल्स (ट्रॅक्स) आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातात विकास नारायण गायकवाड (वय ३२, रा. उमरदरी, ता. मुखेड) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला ओमप्रकाश नागोराव कोनापुरे (वय ५०, रा. उमरदरी, ता. मुखेड) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

ही दुर्घटना २५ मार्च रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. एमएच २६ एएक्स ५०७१ क्रमांकाच्या दुचाकीवरून नरसीकडून उमरदरीकडे जात असताना, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच २६ सीएल ५७८६ क्रमांकाच्या ट्रॅक्स वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT