एक तारखेपासून 'माझे गाव-आरोग्य संपन्न गाव' अभियान सुरु file photo
नांदेड

एक तारखेपासून 'माझे गाव-आरोग्य संपन्न गाव' अभियान सुरु

प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी कर्डिले व सीईओ कावली यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

'My Village – A Health-Rich Village' campaign begins on the 1st

नांदेड, पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी आणि निरोगी समाज निर्मितीसाठी माझे गाव आरोग्य संपन्न गाव हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे.

नादेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनानुसार, १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात या अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. "प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त" या तत्त्वानुसार प्रत्येक गाव रोगमुक्त आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे.

अभियानाचे स्वरूप व पुरस्कार

हे अभियान केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजना आणि शाश्वत विकास ध्येयांशी (-३) संलग्न आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती, तालुका आणि जिल्ह्यांना राज्यस्तरावर कोट्यवधी रुपयांची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

एक एप्रिलला गावोगावी विशेष ग्रामसभा

अभियानाच्या पहिल्याच दिवशी १ एप्रिल रोजी, जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष आरोग्य ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांना अभियानाच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली जाईल. आरोग्य, स्वच्छता आणि शुद्ध पाणीपुरवठा या विषयांवर चर्चा करून ग्रामस्थांची भूमिका स्पष्ट केली जाईल. लोकसहभागातून गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सामूहिक संकल्प केला जाईल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT