Nanded News : आ. राजेश पवार पुनमताईंसह शेतकऱ्यांच्या भेटीला थेट बांधावर...!  File Photo
नांदेड

Nanded News : आ. राजेश पवार पुनमताईंसह शेतकऱ्यांच्या भेटीला थेट बांधावर...!

पीक कापणी प्रयोगाची प्रत्यक्ष पाहणी : उपक्रमामध्ये भाजपा कार्यकर्तेही सहभागी

पुढारी वृत्तसेवा

MLA Rajesh Pawar inspected the agriculture damaged due to rains

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: मागील आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार व सौ. पुनमताई हे पती-पत्नी शेती व शेतक-यांच्या पुनर्बाधणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आस्थेने विचारपूस करीत आहेत. अनेक ठिकाणी पीक कापणी प्रयोगात ते सहभागी झाले. यावेळी भाजपा कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत होते.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नायगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, तसेच पीक विमा योजनेत कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी आज आमदार राजेश पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पुनमताई पवार यांनी धर्माबाद, उमरी आणि नायगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह थेट शेतीच्या बांधावर जाऊन पीक कापणी प्रयोग तपासले.

ऑगस्टपर्यंत पावसाचा प्रवास सुखा वणारा होता. खरिपातील पीक परिस्थिती चांगली होती. यंदा विक्रमी उत्पादन निघेल, असे दावेही केले जात होते. झपाट्याने वाढ होऊ लागल्याने प्रत्येक शेतातील पीक नजरेत भरत होते. केळीला चांगला भाव होता. ऊसाच्या हंगामाची प्रतीक्षा होती. सोयाबीन, कापूस व अन्य पीके शेतकऱ्यांचा उत्साह वाढवत असताना स्वातंत्र्य दिनापासून पावसाची मर्जी खप्पा झाली आणि संततधार व धो चो पाऊस सुरु झाला. ऑगस्टचे १५ दिवस व सप्टेंबर महिना पावराने होते नव्हते ते सर्व धुवून नेले.

शेतकऱ्यांचे प्रबंड नुकसान झाले आहे. अनेक नेते केवळ फोटोसेशनपुरते शेतात जाऊन बांबले असताना, आमदार पवार मात्र प्रशासनासह बेचेट संपर्क ठेवून प्रत्यक्ष मदतीसाठी कार्यरत आहेत. त्यांनी अतिवृष्टीदरम्यान जीवितहानी आणि पशुधन हानी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या आणि नुकसानीबाबत शासनाकडून तातडीची मदत मिळाची यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या वर्षी पीक कापणी प्रयोगावर भर दिला गेल्याने पीक विमा कंपन्यांच्या सर्व्हे प्रक्रियेतील पारदर्शकता व अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आ. पवारांनी स्वतःहून शेतीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. भाजपा कार्यकत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सच्हें नीट व्हावा यासाठी शेतक-यांसोबत सहभाग नोंदवला.

गेल्या चार वर्षापासून आ. पवार पीक विमा कंपन्यांच्या बेफिकिरी व मनमानीविरुद्ध सातत्याने लढा देत आहेत. पूर्वी कमी प्रशिक्षण घेतलेल्या व अपुरी माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांकडून झालेले त्रुटिपूर्ण सर्वेक्षण शेतकऱ्यांना अन्यायकारक ठरले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा आमदार पवार यांनी संपूर्ण मतदारसंघात पारदर्शक आणि निः पक्ष पाहणी मोहीम सुरू केली आहे.

शेतकऱ्यांसाठी लढणे हे कर्तव्य

"शेतकऱ्यांच्या घामाच्या किंमतीला न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. या वर्षीं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत कोणत्याही शेतकऱ्याला विमा कंपन्यांनी फसवू नये, म्हणून आम्ही प्रत्यक्ष बांधावर उतरलो आहोत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT