Minor Girl Marriage (Pudhari File Photo)
नांदेड

Nanded Child Marriage | अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

नायगाव तालुक्यातील इंकळीमाळ येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Naigaon Minor Girl Marriage

नायगाव : तालुक्यातील इंकळीमाळ येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी पाच जणांसह इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करून हा विवाह पार पडल्याची बाब समोर आली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास इंकळीमाळ येथे संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही संगनमताने तिचा विवाह लावून देण्यात आला. या प्रकारामुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या प्रकरणी माधव शेळगावकर जाधव, प्रेमला महादेव पवार, रामेश्वर बालाजी पुयड, किसनाबाई बालाजी पुयड, बालाजी कोंडीबा पुयड यांच्यासह इतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत कार्यालय, इंकळीमाळ येथे कार्यरत असलेल्या विद्या लक्ष्मणराव मोरे (वय ३८) यांनी या घटनेची माहिती मिळताच पुढाकार घेत कुंटूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत कलम ९, १० व ११ तसेच बीएनएस २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पवार करीत असून, बालविवाहासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT