Mukhed Taluka Mild Earthquake Pudhari
नांदेड

Nanded Earthquake | मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, धनज आणि जामखेड गावांत जाणवले धक्के

पुढारी वृत्तसेवा

Mukhed Taluka Mild Earthquake

नांदेड : मुखेड तालुक्यात बुधवारी (दि.११) दुपारी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद झाली आहे. हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, धनज आणि जामखेड या गावांतील ग्रामस्थांनी दुपारी सुमारे ३.२५ वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हलल्याची माहिती प्रशासनाला दिली.

या घटनेनंतर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपास केला असता दुपारी १५:२० वाजता रिश्टर स्केलवर ३.० तीव्रतेच्या धक्क्याची नोंद झाल्याचे स्पष्ट झाले. या भूकंपाचा केंद्रबिंदू मुखेड तालुक्यातील खपराळ गावाजवळ असल्याची माहिती मिळाली आहे. हा धक्का अतिसौम्य स्वरूपाचा असून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती तहसीलदार, मुखेड यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास दिली आहे.

दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. ज्या घरांवर पत्र्याचे छत असून त्यावर दगड ठेवलेले आहेत, त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने ते दगड तात्काळ काढून टाकावेत आणि पत्रे बोल्टने व्यवस्थित बसवून घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले.

पुन्हा अशा प्रकारचा आवाज किंवा धक्का जाणवल्यास नागरिकांनी तात्काळ घराबाहेर मोकळ्या जागेत जावे आणि प्रशासनाशी (०२४६२) २३५०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT