Crime News pudhari photo
नांदेड

Nanded Crime : खंजीरसह चौघांना अटक; पोलिसांची कारवाई

आरोपींकडून धारदार आणि टोकदार लोखंडी खंजीर जप्त

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : लोहा तालुक्यातील उस्माननगर येथील समता कॉलेजच्या पाठीमागील रस्त्यावर बेकायदेशीरपणे घातक शस्त्र बाळगून फिरणाऱ्या चार तरुणांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. आरोपींकडून धारदार आणि टोकदार लोखंडी खंजीर जप्त करण्यात आला आहे.

उस्माननगर पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, समता कॉलेज परिसरात काही तरुण संशयास्पदरीत्या थांबले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक महेश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तातडीने धाड टाकून शेख सुफियान शेख (१९), शेख समिर शेख (२३), शेख दस्तगिर (२३) आणि मुस्तफा पठाण (१९) यांना ताब्यात घेतले.

पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपी मुस्तफा पठाण याच्या कमरेला काळ्या रंगाच्या म्यानात ठेवलेला धारदार खंजीर मिळून आला. पोलिसांनी शस्त्र जप्त करून चौघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा व भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस शिपाई साईनाथ मोरे या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT