Mandvi Police Public Notice
मांडवी: मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध गुन्ह्यात सापडलेल्या बेवारस दुचाकी वाहन पडून असून दोन दिवसांत ओळख पटवून ताब्यात घ्यावे. अन्यथा वाहनाचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गफार शेख यांनी दिली आहे.
मांडवी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात विविध प्रकारच्या गुन्ह्यात सापडलेल्या एकूण सहा दुचाकी वाहने आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून या दुचाकीची व दुचाकीच्या मालकाची ओळख पटलेली नाही. सदरील दुचाकी या पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आलेल्या आहेत. या वाहनाची यादी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर व ( www.nandedpolice.gov.in ) फेसबुक पेज, ट्विटर वरती असून मांडवी पोलीस स्टेशनच्या नोटीस बोर्डवर देखील लावण्यात आलेली आहे.
जप्त करण्यात आलेली बेवारस वाहनांची दोन दिवसांच्या आत आपली व नातेवाईकांची असल्यास त्या वाहनाची मालकी हक्काची ओळख व पुरावा दाखवून वाहन आपल्या ताब्यात घ्यावे . अन्यथा सर्व वाहनांवर कोणाचाही हक्क अधिकार नाही. असे गृहीत धरून त्या वाहनाचा लिलाव करण्यात येईल. असे आदेश वरिष्ठ कार्यालयातून देण्यात आले आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक गफफार शेख यांनी दिली.