Nanded News : सांगवीतील चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याऱ्यास जन्मठेप File Photo
नांदेड

Nanded News : सांगवीतील चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याऱ्यास जन्मठेप

जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी सुनावली शिक्षा

पुढारी वृत्तसेवा

Man sentenced to life imprisonment for abusing four-year-old girl in Sangvi

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या २५ वर्षीय नराधमाला जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी गुरुवारी (दि.२०) जन्मठेप आणि ५० हजार ५०० रुपये रोख दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच बालिकेला जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाकडून तिच्या पुनर्वसनासाठी नुकसान भरपाई सुनिश्चित करण्याचे आदेश दिले.

सांगवी परिसरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६ मार्च २०२३ रोजी ही घटना घडली होती. त्यानुसार माधव ऊर्फ बाळ्या रमेश जानोळे (वय २५) याने चॉकलेटचे आमिष दाखवून चार वर्षीय बालिकेला आपल्या घरी बोलावून अत्याचार करून तिला खोलीतच डांबून ठेवले होते. बऱ्याच वेळानंतर बालिकेची आई व इतर नातेवाईकांनी तिचा शोध घेऊन, तातडीने तिच्यावर वैद्यकीय उपचार केले.

याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सपोनि रुपाली कांबळे यांनी केला. आरोपीला अटक करून संपूर्ण पुरावे गोळा करून माधव जानोळेंविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. ११ साक्षीदार तपासून सरकारी वकील अॅड. मनीकुमारी बतुल्ला डांगे यांनी युक्तिवाद केला. उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) रामेश्वर व्यंजने आणि पोनि चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून अमलदार देवप्पा विभुते यांनी काम बघितले. बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

आठ दिवसांपूर्वीच सांगवी परिसरात एका चार वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटला ताजी असतानाच गुरुवारी वाडी बु. येथेही बालिकेवर एका शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या नराधमांना पोलिसांचा धाक नसल्याने या घटनांत वाढ होता दिसून येत आहे. परिणामी, मुलींना शाळेत पाठवायचे की नाही अशी अवस्था पालकांची झालेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT