माळाकोळी : पुढारी वृत्तसेवा
लोहा-अहमदपूर मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणारे दोन हायवा जवळपास दहा ब्रास अंदाजे वाहनसह किंमत 40 लाख 50 हजार रूपये. या वाळू वाहतूकीची वाहने मंगरूळ घाटात पोलिसांनी पकडून मोठी कारवाई केली. यामुळे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शनिवार दिनांक 3 सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोहा येथून अहमदपूरकडे अवैद्य वाळूची वाहतूक करणारे हायवा ट्रक क्रमांक MH26BE8201 व MH26CH2409 हे दोन हायवा येत असल्याची माहिती माळाकोळी पोलिसांना मिळाली. यावरून मंगरूळ घाट या ठिकाणी दोन्ही वाहने पकडून माळाकोळी पोलीस स्टेशन येथे आणली.
दरम्यान पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही वाहनांचे चालक फरार झाले असून, वाहनातील वाळूसह वाहनाची एकूण किंमत 40 लाख 50 हजार एवढी आहे. या मोठ्या कारवाईमुळे वाळू व्यवसाय करणाऱ्यांची धाबे दणाणले असून, नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध मार्गाने वाळूचा मोठा व्यवसाय सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. अवैध धंदे विरोधी अभियान उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी राबवलेल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले असून, अवैध धंद्याला नांदेड जिल्ह्यात आळा बसल्याचे बोलले जात आहे.
माळाकोळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवर पोलीस आमलदार नामदेव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.