Mahur Shri Renuka Devi: Mahur Navratri festival included in the Tourism Department calendar
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : ऑगस्टमध्ये पर्यटन विभागाने राज्यातील प्रमुख व स्थानिक महोत्सवांची एक दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. त्यात माहूर येथील श्री रेणुका देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवाचा समावेश नव्हता. ही उणिव हेरुन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पर्यटन विभागाला एक पत्र लिहिले. त्याची दखल घेत मंगळवारी (दि. १६) स्वतंत्र शासन निर्णय जारी करीत प्रमुख पर्यटन महोत्सवात माहूरचा समावेश करण्यात आला आहे.
आदीमायेच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे श्री क्षेत्र रेणुका देवीचे प्रसिद्ध असे प्राचीन मंदिर देशभर प्रसिद्ध आहे. श्री क्षेत्र रेणुका देवी नवरात्र.
उपरोक्त स्पर्धेशिवाय पर्यटन संचालनालयामार्फत फॅम टूर्सचे आयोजन करणे, पर्यटन विषयक कॉन्क्लेव्ह, फेअर, इव्हेंटचे आयोजन सुद्धा करण्यात येणार असल्याचा उल्लेख शासन निर्णयात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संकेतस्थळावर व यू-ट्युब चॅनेलवर सर्व कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.