Loha Political News
लोहा, पुढारी वृत्तसेवा : 'सुंदर शहर,हरित शहर' साठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. माजी नगराध्यक्षा जिजाबाई मुकदम यांच्या काळात शहरात अनेक कामे झाली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात चांगले कामे होतील, असा विश्वास व्यक्त करत मुकदम व चिखलीकर कुटुंबात अनेक पिढ्या पासून कुटुंबिक व जिव्हाळ्याचे नाते राहिले आहेत, असे उद्गार आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा येथील एका कार्यक्रमात काढले.
लोह्याच्या थेट जनतेतून निवडून आलेल्या पहिल्या नगराध्यक्षा जिजाबाई मुकदम यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आ. प्रतापराव पाटील चिखलीकर बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, अॅड. मुक्तेश्वर धोंडगे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार, आयोजक माणिकराव मुकदम, सचिन पाटील चिखलीकर, केशवराव मुकदम, गटनेते भास्कर पवार, माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, नारायराव चव्हाण, माधवराव चव्हाण, सचीन मुकदम, डॉ. दिनेश चव्हाण, प्रा. डॉ. डी. एम. पवार, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, सुधाकर पवार, नामदेव पाटील पवार, आत्माराम मुकदम, सतीश मुकदम, शिवराज मुकदम, आप्पाराव पवार, बिपिन मुकदम व सर्व चव्हाण मुकदम परिवार, डॉ. संजय गुंडावार व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी माणिकराव मुकदम यांनी प्रास्ताविक केले. तर नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार यांनी विचार मांडले. कोटलवार परिवाराच्या वतीने आमदार चिखलीकर यांचा सत्कार करण्यात आला. विक्रम कदम यांनी सूत्रसंचालन केले. बिपीन चव्हाण यांनी आभार मानले.
कार्यक्रमात दोन्ही परिवारांच्या नात्यांना उजाळा
आ. चिखलीकर यांनी मुकदम परिवारासोबत चिखलीकर कुटुंबाचे अनेक पिढ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नगराध्यक्षा स्व. जिजाबाई मुकदम यांच्या काळात शहरात अनेक कामे झाली. आता उर्वरित कामे होतील, असा विश्वास व्यक्त करत दोन्ही परिवाराच्या नात्यांना उजाळा दिला.