Kinvat Taluka Water Crisis (Pudhari File Photo)
नांदेड

Kinwat Taluka Water Storage | किनवट तालुक्यातील २१ जलप्रकल्पांत ७०. ४५ टक्के उपयुक्त जलसाठा

Rain | सध्या वार्षिक सरासरीच्या ४९.५५ टक्केच झाला पाऊस

पुढारी वृत्तसेवा

Kinavat Water Project

किनवट : किनवट तालुक्यातील एकूण २१ जलप्रकल्पांपैकी केवळ चार प्रकल्प पूर्णतः भरले असून सहा क्षमतेपेक्षा थोडे कमी भरले आहेत. मात्र उर्वरित ११ लघुप्रकल्प अजूनही तहानलेलेच आहेत. सद्यस्थितीत सर्व प्रकल्पांतील एकूण उपयुक्त जलसाठा ७०. ४५ टक्के आहे. सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून दमदार पावसाची गरज आहे.

१ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान १,०२६.५८ मिमी आहे. आज रविवार (दि.२७) पर्यंत प्रत्यक्षात ५०८.७० मिमी पाऊस झाला असून, तो उपरोक्त पाच महिन्यांच्या सरासरीच्या ४९.५५ टक्के इतका आहे. सध्या तीन मध्यम प्रकल्पांमध्ये ८१.७७ टक्के, दोन बृहत लघु व १३ लघुप्रकल्प मिळून ५७.४४ टक्के, तर तीन साठवण तलावांमध्ये ९२.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

प्रकल्पनिहाय सद्यस्थितीतील जलसाठा (दशलक्ष घनमीटर आणि कंसात टक्केवारी) : नागझरी मध्यम प्रकल्प – ६.३७७ (९७.१५%), लोणी मध्यम प्रकल्प – ८.३८० (१००.००%), डोंगरगाव मध्यम प्रकल्प – ४.६७२ (५३.०५%), सिरपूर बृहत – ४.१८० (१००.००%), मांडवी बृहत – २.५७९ (५०.१७%). लघु प्रकल्प : कुपटी – ०.१४० (११.०६%),मूळझरा – ०.५५२ (३०.४७%), थारा – ०.७१५ (८२.८३%), निचपूर – १.२७० (५७.५९%), जलधारा – १.४२३ (७६.२२%), सिंदगी – ०.६७० (४१.९२%), हुडी – ०.७८५ (५०.१६%), पिंपळगाव (कि.) – २.०३८ (९४.०५%), नंदगाव-ज्योत्याखाली, अंबाडी – ०.८१० (१००.००%), दरसांगवी – १.२१३ (४५.१४%), पिंपळगाव (भि.) – ०.७३० (३२.००%), सावरगाव – ०.८६१ (६५.६९%). साठवण तलाव : निराळा – २.२६२ (१००.००%), सिंदगी – २.१९६ (९४.९०%), लक्कडकोट – १.४२२ (७८.३९%)

२१ जलप्रकल्पांपैकी लोणी मध्यम प्रकल्प, सिरपूर व अंबाडी हे दोन लघुप्रकल्प आणि निराळा साठवण तलाव हे चारच प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. नागझरी मध्यम प्रकल्प, पिंपळगाव (कि.) लघुप्रकल्प आणि सिंदगी साठवण तलाव हे ९५ टक्क्यांच्या आसपास भरले असून, थारा, जलधारा व लक्कडकोट साठवण तलाव हे ७५ ते ८५ टक्क्यांदरम्यान भरले आहेत.

उर्वरित ११ प्रकल्पांपैकी कुपटी, सिंदगी व पिंपळगाव (भि.) प्रकल्पांत तांत्रिक दोषांमुळे पाणीसाठा टिकून राहत नाही. नंदगाव प्रकल्प तर दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरतच नाही. यंदाही अर्धा पावसाळा उलटून गेल्यावरसुद्धा पाणी ज्योत्याच्या वर गेलेले नसल्यामुळे, त्याची नोंदच घेतली गेलेली नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT