Ganeshotsav : तेलंगणात निर्यात होणाऱ्या श्री मूर्तीत यंदा वाढ !  File Photo
नांदेड

Ganeshotsav : तेलंगणात निर्यात होणाऱ्या श्री मूर्तीत यंदा वाढ !

तयार वस्त्रालंकार, मुकूट सजावटीमुळे मूर्तीचे सौंदर्य द्विगुणित

पुढारी वृत्तसेवा

Increase in Shri Ganesha idols exported to Telangana this year!

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: हैदराबादसह संपूर्ण तेलंगणात गणेशोत्सव मठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी नांदेड येथून श्री मूर्ती तिकडे जातात. यावर्षी त्यात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्तीवरील बंदी उठली असली तरी अवधी कमी मिळाल्याने निर्मितीचे प्रमाण कमी आहे.

कालौघात नैसर्गिकरित्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने श्री मूर्तीच्या किमतीमध्ये साधारण ३० टक्के वाढ झाली आहे. शिवाय प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तीवर निर्बंध होते. या विरोधात मुर्तीकार न्यायालयात गेले होते. निकाल काय लागेल, याबाबत अनभिज्ञता असल्यामुळे मुर्तीकारांनी सावधगिरी म्हणून मोठ्या मूर्ती बनवल्या नव्हत्या. न्यायालयाचा निकाल मे महिन्यात आला, तो मुर्तीकारांच्या बाजुने; परंतु त्यानंतर मूर्ती बनवण्यासाठी वेळ कमी उरला. तुलनेने मागणी अधिक आहे, अशी माहिती प्रसिद्ध मूर्तीकार गजेंद्रसिंह ठाकूर यांनी दिली.

यंदा बाँम्बे मेकर हा नवीन प्रकार प्रचलित झाला असून मुर्तीचे वस्त्रालंकार मूर्ती तयार झाल्यानंतर परिधान केले जात शेला किंवा मुकुट, दागिने आहेत. अर्थात धोतर, उपरणे, मुर्तीला रंगवण्याऐवजी नंतर मूर्तीवर सजविले वेळेअभावी मुर्त्यांमध्ये विविध प्रकार नसले तरी जात आहेत. त्यामुळे रंगकाम कमी झालेच. शिवाय सौंदर्यसुद्धा द्विगुणित झाले आहे.

तिरुपती बालाजी, लालबागचा राजा, दगडुशेठ हलवाई, महाराजा आसन असे पारंपरिक प्रकार प्रचलित आहेत. फिल्मी ट्रेंड कमी झाला असून देवरुपी स्टाईलच्या मुर्त्यांना मागणी वाढली आहे.

हैदराबादेतून श्री मूर्ती मागवण्याचे प्रमाण भरपूर आहे. नांदेडमधील सार्वजनिक मंडळांच्या अवाढव्य मूर्ती तिथून मागवल्या जातात; परंतु सुबक रंगसंगती आणि रेखीवपणा तसेच कमी किमतीमुळे नांदेडमधून तेलंगणात जाणाऱ्या मूर्तीचे प्रमाण सुद्धा खूप आहे. यावर्षी त्यात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, मजुरांची कमतरता, वाढलेली मजुरी व वेळेचा अभाव यामुळे मूर्तीच्या किमतीसुद्धा वाढल्या आहेत.

यावर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पालिका, नगर परिषदा व महानगर पालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे सुद्धा गणेशभक्तांत उत्साह असून दरवर्षीपेक्षा मंडळांची संख्या सुद्धा अधिक आहे. राजकीय पुढारी व पदाधिकाऱ्यांची वर्गणी देता देता दमछाक होणार असून सर्व मंडळांच्या सामूहिक आरत्यांना राजकीय मेळ्यांचे स्वरूप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT