Inclusion of OBC Maratha Community Unfair OBC Community Protests
हिमायतनगर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाने दि. २ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील व्यक्तींना मराठी कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग खुला केला आहे. या निर्णयाचा हिमायतनगर तालुक्यात ओबीसी समाजबांधवांनी जाहीर निषेध नोंदवत तसेच अध्यादेशाची होळी करून ओबीसी समाजाने आपला रोष व्यक्त केला.
यावेळी शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. ओबीसी समाजाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर व असंवैधानिक आहे. यामुळे ओबीसी समाजातील सुमारे ४०० हून अधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार असून, शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रातील त्यांचे प्रतिनिधित्व धोक्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचे तालुकाध्यक्ष बाबाराव जरगेवाड, खंडूजी काळे, दिलीप राठोड, प्रभाकर मुध ोळकर, सुभाष शिंदे, मायंबा होळकर, सदाशिव सातव, बाबूराव होनमाने, अशोक अनगुलवार, निलेश चटणे, अभिषेक बक्केवाड, दिनेश राठोड, लक्ष्मण जाधव, नारायण देवकते, अशोक आच्चमवाड, श्याम जक्कलवाड, आनंद मुतनेपाड, सदाशिव काळे, राम नरवाडे, सचिन धोंडू पाटील, दत्ता देवकते आर्दीसह शेकडो ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.
देगलुर, पुढारी वृत्तसेवाः दिनांक २ सप्टेंबर रोजी मुंबईतील मराठा आंदोलन दबावाला बळी पडून महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय पारित केला आहे. यामुळे ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा अवैध मार्ग मोकळा झाल्याचा आरोप ओबीसी कार्यकर्त्यांनी केला असून याबाबत देगलूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तो रद्द करण्याची मागणी देगलूर येथील उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली.
यावेळी शासन निर्णयाची होळी देखील करण्यात आली. यावेळी उत्तमराव वाडीकर, पुंडलिक गुरूपवार, बिल. आर. चिलवरवार, गणप-तराव सुरनर, बालाजी ढगे, दासरबार सूर्यकांत, शंकर चटलुरे, यादवराव मुत्तेपवार, बालाजी चौधरी, किशन जाधव, बालाजी मैलागिरे, श्रीनिवास ऊलेवार, बलीराम रामदिनवार, मष्णाजी मलगिरवार, रितेश यलगलवार आदी उपस्थित होते.