नांदेड

राहेर : अवैध वाळूचा उपसा करणारी बोट जाळून नष्ट; तहसीलदार डॉ. गायकवाड यांची कार्यवाही

करण शिंदे

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात अवैध वीटभट्टी आणि वाळू व्यवसायाचे माहेर घर असलेल्या राहेर येथील अवैध वाळू उपसाची माहिती मिळताच गुरुवारी (दि.30) पहाटे नायगावच्या तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांनी वाळू माफीयाविरुध्द धाडसी कारवाई केली. राहेर येथील कारवाई त्यांनी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करणारी बोट आणि इतर साहित्य जाळून नष्ट केले.

या प्रकरणाची पहिल्यांदाच एवढी मोठी धाडसी कारवाई करण्यात आल्याने तहसीलदारांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तलाठी डाके, मंडळ अधिकारी यांनी हप्ते घेऊन चालविलेल्या अवैध धंद्यांना आतापर्यंतच्या तहसीलदार यांनी पाठीशी घालणे. अप्रत्यक्षरित्या सहकार्य करण्याचे काम केले. परंतु, या वेळी गायकवाड यांनी घेतलेला हा मोठा निर्णय सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

गेल्या काही दिवसापासून नायगाव तालुक्यात महसूल विभागाला अंधारात ठेवून काही वाळू माफियांनी कुठलीही परवानगी नसताना राहेर परिसरातील नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा करत होते. याची माहिती महसूल प्रशासनाला असून देखील कार्यवाहीचा बडगा उगारला जात नव्हता. वजीरगाव अवैध प्रकरणाची झालेली बदनामी यावर पांघरुण घालण्यासाठी ही कार्यवाही आहे का ? अशी चर्चा असून वजीरगाव प्रकरणात शासनाचे मोठे अर्थिक नुकसान तर झालेच. शिवाय महसूल विभागाचीही बदनामी झाली होती. यातून संशयाची सुई कोणाकडे फिरते न फिरते तोच ही धाडसी कार्यवाही यातून सर्व काही प्रश्नांची उत्तरे देणारी ठरली आहे.

गुरुवारी पहाटे तहसीलदारांनी धाडसी पाऊल उचलून वाळू माफीयांचे मनोधैर्य तर मोडलेच पण या कारवाईतून माफीयांना एक प्रकारे इशाराही दिला आहे.  गुरुवारी पहाटे स्वतः, वाहण चालक तुकाराम पुरी, सुधाकर डोईवाड, डोंगरगाव पोलीस पाटील जमनाजी डोईवाड, कुंटुर पोलीस ठाण्याचे कर्मचारी बशीर शेख व पोलीस वाहन चालक यांना सोबत घेवून थेट गोदावरी नदी येथे गेल्या. यावेळी त्यांना बोटच्या सहाय्याने वाळूचा उपसा करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बोटसह इतर साहित्य जाळून नष्ट केले.

तहसीलदार गायकवाड यांनी सदरच्या कारवाईबाबत गुप्तता पाळली होती. याबाबत हप्तेखोर तलाठी डाके व मंडळ अधिकाऱ्यांना काहीही माहिती नव्हती. त्यामुळे तहसीलदारांना अंधारात ठेवून तलाठी आणि मंडळ अधिकारी वाळू माफीयांना सहकार्य होतं अशी चर्चा राहेर नायगाव तालुक्यातील नागरिकांतून बोलल्या जात आहे. तलाठी संघटनेने वजीरगाव प्रकरणात तहसीलदार यांची बदनामी करीत केलेला प्रकार व राहेर प्रकरणात झालेली धाडसी कार्यवाही यामुळे यातील राजकारण उघडकीस येत नसले तरी झालेली कार्यवाही आभिनंदनीय असल्याचे वक्तव्य सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT