सोपान बोंपीलवार
हिमायतनगर: नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये कांग्रेस पक्षाला बहुमताने सत्ता मिळाली आहे.नव्याने कार्यरत होणाऱ्या नगरपंचायत बॉडी मध्ये नगराध्यक्षासह 16 नगरसेवक हे नविन समावेश तरुण नगरसेवक निवडून आले असुन नऊ महिलांचा समावेश आहे.तर या निवडणुक रिंगणात उतरलेल्या जुन्या माजी उपनगराध्यक्षासह माजी नगरसेवकांना मतदारांनी डावलेले आहे.
हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे केले होते. या पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीत यश मिळविण्यासाठी मोठी धडपड केली होती. परंतु या निवडणुकीमध्ये माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी काटेकोर नियोजन करून सत्तेच्या चाब्या पुन्हा एकदा आपल्याकडेच ठेवली. नगराध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे शेख रफिक शेख महेबुब हे मताधिक्याने विजयी झाले असुन 08 नगरसेवक काँग्रेस पक्षाचे बहुमताने निवडून आले आहेत.
शिवसेना उबाठाचे 03, भाजपाचे 02, शिंदे शिवसेना 02, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा 01 असे असुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खाते देखील उघडता आले नाही. विद्यमान आमदारांच्या गटाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. एका नगराध्यक्षासह एकुण 16 नगरसेवक हे नविन चेहरे असुन यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एकच नगरसेवक हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे 09 महिला नव्याने नगरसेविका सभागृहात बसणार आहेत. नविन चेहरे निवडणुकीत निवडून आले असून मतदारांनी नवीन चेहऱ्यांकडून शहरातील मोठ्या विकास कामाची अपेक्षा ठेवल्या आहेत.
नगराध्यक्षपदी शेख रफिक शेख महेबुब तर पुरूष नगरसेवकांमध्ये विनोद गुंडेवार,विठ्ठल ठाकरे, सरदार खान खलील खान,भारत डाके, आशिष सकवान, सुभाष बलपेलवाड,म.मुजतबा मतिन,मिरझा जिशान बेग,तर महिला नगरसेविका कंजूल फिरदौस अ.हक्क,कमल संभाजी मेंडके, हसिना बेगम अब्दुल्ल सलाम,दर्शना रमेश पंडित,शेख सलमाबी इलियास,सलमाखानम समदखान, अरूणा भगवान मुद्देवाड, सुचिता कुणाल राठोड,दर्शना शरद चायल आदी महिलांचा समावेश आहे. पुरूष नगरसेवकांमध्ये सर्वाधिक नविन चेहऱ्यांचा समावेश आहे. कांग्रेस पक्षाला बहुमत असले तरी उपनगराध्यक्ष पदासाठी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून आहे.