Highway work : एक महिना पूर्ण होऊनही महामार्गाचे काम अपूर्णच File Photo
नांदेड

Highway work : एक महिना पूर्ण होऊनही महामार्गाचे काम अपूर्णच

फुलवळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५०चे काम रखडले

पुढारी वृत्तसेवा

Highway work remains incomplete even after a month

धोंडिबा बोरगावे फुलवळ : नांदेड ते बिदर फूलवळ मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक अतिक्रमण धारकांना नोटीसा देऊन येत्या दहा दिवसांमध्ये अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले.

अशा नोटिसीची कालग्रर्यादा ही संपली. परंतु या नोटीसीचा कसल्याच प्रकारचा परिणाम झाला नसल्याचे दिसून येते. अतिक्रमण काढून घेण्यासाठी प्रत्येक नोटीसित दहा दिवसाचा कालावधी देण्यात आला होता, हा कालावधी संपून जवळपास एक महिना होत आला तरीही अद्यापही अतिक्रमण काढण्यात आले नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाला फक्त नोटीस देण्याइतकाच वेळ मिळाला होता का? हाही प्रश्न येथील समस्त गावकऱ्यांना पडलेल्या दिसून येत आहे. विभागाने जशी नोटीस देण्याची तत्परता दाखवली तशीच तत्पर्ता अतिक्रमण काढण्यास का दाखवत नाही, गेल्या चार वर्षापासून फूलवल येथील रोडचे काम अर्धवट अवस्थेमध्ये सोडून गुरु दार पळून गेले आहे. या अर्धवट राहिलेल्या कामामुळे येथे नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असतात.

जीवितहानी झाल्यावर जाग येणार का

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फुलवळ येथील रस्त्याच्या लगत अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना नोटीस काढून अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अतिक्रमण काढण्याची तात्परता कोणीही दाखवली नाही. फुलवळ येथील राहिलेला अर्धवट स्ता पूर्ण करून अतिक्रमण काढून या रस्त्याचा वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रस्त्याच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह ?

नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्ग फुलवळ गावातून गेल्याने नागरिकांना उदगीर, लातूर, नांदेड येण्या-जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत जवळचा व सोयीचा बनला आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा येथील नागरिकांची होती. मात्र काही दिवसातच या रस्त्याच्या अवस्थेमुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT