हदगाव : हदगाव नगर परिषद मोठ्या प्रमाणात चुरशीची लढाई झाली असून काँगेसकडून नगराध्यक्ष पदासाठी कुमुद सोनुले,तर उध्दव ठाकरे शिवसेना गटा कडून सौ सीमा घाळपा तर .शिंदे गटाकडून माजी खा.सुभाष वानखेडे यांच्या सून सौ.रोहिणी भास्कर वानखेडे अशी तिरंगी लढत होती. यात सौ.रोहिणी भास्कर वानखेडे यांना जनतेने विजयी केले तर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष सुनील सोनुले यांच्या पत्नी कुमुद सोनुले यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. असून सर्वाधिक उद्धव ठाकरे गटाचे 7 नगरसेवक हदगाव नगर परिषद मध्ये विजयी झाले. या विजयाबद्दल खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी समाधान व्यक्त केले.
या निवडणूकीत ठिकाणी खा.नागेश पाटील आष्टीकर, माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपले उमेदवार रिंगणात उभे केले होते. तिरंगी निवडणूक झाली होती. ठाकरे गटाला 7 नगर सेवक निवडूण आणता आले. तर काँग्रेस ला 5 नगर सेवककांवर समाधान मानावे लागले आणि भाजपा मधून वॉर्ड क्रमांक एक मधून सौ . अरुणा गुणवंत काळे,सचिन सूर्यवंशी,साई बाभुळकर या तिन्ही भाजपा उमदेवार यांचा या ठिकाणी विजय झाला. तर शिवसेना शिंदे गटाच्या सौ रोहिणी भास्कर वानखेडे यांना नगर अध्यक्षपद मिळाले तर 5 नगर सेवक पदावर यश आले .
बाकी नगर अध्यक्ष पदासाठी काँग्रेस कडून सौ .कुमुद सुनील सोनुले ह्याना 4 317 मते पडली तर उध्दव ठाकरे गटाचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार यांना सीमा घाळपा यांना 3739 मते पडली तर शिंदे गटाच्या विजयी उमेदवार सौ रोहिणी वानखेडे यांना 5610 यांना मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सौ रोहिणी वानखेडे यांना नगर अध्यक्ष पदासाठी विजयी घोषित करण्यात केले. माजी खा .सुभाष वानखेडे, आ.बाबुराव कदम कोळीकर विवेक देशमुख जिल्हा अध्यक्ष शिवसेना ,अनिल पाटील बाभळीकर, व भाजपा चे सर्व विजयी उमेदवार यांची मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी मतदाराचे आभार भास्कर वानखेडे यांनी मानले आहेत या वेळी हदगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.