Nanded News : शहरालगतच्या नव्या वसाहतीत स्वच्छ भारतची ऐशीतैशी  File Photo
नांदेड

Nanded News : शहरालगतच्या नव्या वसाहतीत स्वच्छ भारतची ऐशीतैशी

उघड्या नाल्या, कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीने नागरिक जेरीस

पुढारी वृत्तसेवा

Garbage is piled up in the new colonies near Nanded city

नांदेड, पुढारी वृत्तसेवा

वाडी ग्रा.पं. हद्दीत स्वच्छ भारत अभियानाची ऐशीतैशी झाली आहे. शहरालगत अनेक नव्या बसाहतीत असेच चित्र पहायला मिळते. उघड्या नाल्या तुंबल्या असून किरकोळ पावसानेसुद्धा त्या उलटून रस्त्यावर येतात. घाण पाणी व कचऱ्यातून मार्गक्रमण करताना लोकांची कुचंबणा होते. प्रत्येक रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधीने नागरिक जेरीस आले आहेत.

महानगरपालिकेच्या हद्दीलगत चोहोबाजूंनी नवनव्या वसाहती निर्माण झाल्या आहेत. आणखी हा सिलसिला सुरूच आहे. असंख्य बांधकामे सुरू असून यामुळे अगोदरच अरुंद रस्ते वाहतुकीसाठी जवळपास बंद झाले आहेत. त्यात लग्नसराईमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंब घरासमोर रस्त्यावर मंडप टाकतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडते आहे. नवीन वसाहतीत काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत, परंतु ती अर्धवट आहेत. त्यामागील कारण विचारले असता जेवढा निधी मंजूर तेवढ्याच अंतरात काँक्रीट टाकून रस्ते उरकले जात आहेत.

बहुतांश नवीन वसाहती ग्रामपंचायत हद्दीत येतात. शिवाय या संस्थांची आर्थिक स्थिती नाजूक असते. त्यामुळे घंटागाडीसारखी नागरी सुविधा त्या पुरवू शकत नाहीत. परिणामी लोक कचरा वस्तीबाहेरच्या रस्त्याच्या कडेला टाकून देतात. यात शाकाहारी व मांसाहारी शिळे अन्नपदार्थ, फळांचा टाकाऊ भाग, निवडलेल्या भाज्यांचा कचरा यासारखे कुजणारे पदार्थ व कोरड्या कचऱ्याची सरमिसळ होते, पावसाळ्यात हे हीग आरोग्यासाठी भोकादायक बनत आहेत. दुर्गधीने लोक वैतागले असून डासांची पैदास प्रचंड झाली आहे.

या भागातील नागरिक त्रस्त बाडी ग्रा.पं. उदीत विशालनगर टी-पॉइंट नजिक श्रीकृष्ण नगरच्या पाटीजवळ एक मोठा नाला चाहतो, त्याला मिळणारी एक नाली पूर्णपणे तुंबली आहे. त्याचे घाण पाणी रस्त्यावर आले असून कच्चा रस्ता असल्याने बंदाड झाले आहे. त्यातून मार्गक्रमण करीत विशालनगर, चिमूर्तीनगर, यशोविहार कॉलनी, एकता नगर, लक्ष्मीनगर वा भागातील लोक कुचंबणा सहन करीत आहेत. गणेशनगर ते काबरानगर हा संपूर्ण भाग तसेच बजाजनगर ते लईजाई नगरी हा संपूर्ण भाग, याशिवाय शहराच्या इतर भागातही अशीच परिस्‍थिती आहे.

नगर पंचायतीची गरज बाडी ग्रा.पं.चा विस्तार प्रचंड झाला असून लोकसंख्येची घनताही प्रचंड आहे, त्यामुळे स्वाभाविकच कचरा निर्मितीचे प्रमाणही खूप वाढले आहे. एवढया मोठ्या परिसराला नागरी सुविधा पुरवणे ग्रामपंचायतीच्या ताकदीबाहेरचे असल्याचे लोकांचे मत आहे. त्यामुळे येथे स्वतंत्र मगर पंचायतीची लवकर स्थापना झाली पाहिजे. आ. बालाजीराव कल्याणकर यांनी गावावत जाहीर मागणी अनेकवेळा करून पाठपुरावाही सुरू केला आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याशिवाय या दृष्टीने पाउले पडतील, अशी चीन्हं नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT