Ganja  
नांदेड

गांजा तस्कर जेरबंद; सव्वा लाखाचा गांजा जप्त

Nanded crime news| स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एकाला बेड्या, मुख्य सूत्रधारावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हशीचा बाजार परिसरात छापा टाकून पोलिसांनी सव्वा लाख रुपये किमतीचा २ किलो २५१ ग्रॅम गांजा जप्त केला असून, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मिलिंद सोनकांबळे व त्यांचे पथक दि. १७ एप्रिल रोजी गस्तीवर होते. यावेळी शंकरराव चव्हाण चौक, म्हशीचा बाजार समोर एक इसम अमली पदार्थाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी शासकीय पंच आणि पथकासह सापळा रचून रात्री ७:४५ च्या सुमारास सय्यद सदरु सय्यद सलिम (वय २९, रा. बाबा कॉलनी, सांगवी बु.) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता, त्यात उग्र वासाचा हिरव्या रंगाचा गांजा (पाने, बोंडे व बिया) मिळून आला.

पोलिसांनी ५० हजार रुपये प्रति किलो दराने एकूण १ लाख १२ हजार ५५० रुपये किमतीचा २ किलो २५१ ग्रॅम मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सय्यद सदरु सय्यद सलिम व सुत्रधार शेख शफी विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि उदय खंडेराय, पोउपनि मिलिंद सोनकांबळे, अंमलदार बामणे, स्वामी, अझरोद्दीन, कुलचे आणि बिरादार यांनी केली आहे.

मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

पोलिसांनी आरोपी सय्यद सदरु याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हा माल शेख शफी (रा. महेबुब नगर, नांदेड) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. या माहितीवरून पोलिसांनी शेख शफी यालाही आरोपी केले असून, त्याचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT