Crime News : पेट्रोल पंपांवर स्कॅनरने गंडवणारी टोळी जेरबंद File Photo
नांदेड

Crime News : पेट्रोल पंपांवर स्कॅनरने गंडवणारी टोळी जेरबंद

नांदेड सायबर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Gang defrauding at petrol pumps using scanners nabbed

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल पंपावरील क्यूआर कोड स्कॅनरचा वापर करून तांत्रिक फेरफार करत चालकांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा नांदेड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एक चारचाकी वाहन, पाच महागडे मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ९ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

देगलूर आणि बिलोली परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर गेल्या काही दिवसांपासून ही टोळी सक्रिय होती. आरोपी पेट्रोल पंपावरील स्कॅनरवर बनावट पद्धतीने पैसे पाठवल्याचे भासवून त्या बदल्यात पेट्रोल पंप चालकांकडून रोख रक्कम घेत असत. या माध्यमातून त्यांनी देगलूर, नरसी, बिजूर, वझरगा आणि अटकळी येथील विविध पंपांवरून ६ लाख २४ हजार ८०८ रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी शेख मसूद यांनी देगलूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत सप्रे यांना तपासाचे आदेश दिले होते. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने जाळे विणले. देगलूर परिसरात ही टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती मिळताच सापळा रचून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर अधिक चौकशीत या टोळीची पाळेमुळे तेलंगणा आणि पुण्यापर्यंत पसरल्याचे समोर आले. ही कारवाई सायबर पोलिस निरीक्षक वसंत सप्रे, राजेंद्र सिटीकर, दीपक, विलास राठोड, अविनाश ढोके, दाविद पिडगे, काशिनाथ कारखेडे आणि ज्ञानेश्वर यन्नावार यांच्या पथकाने केली.

अटकेतील आरोपी

अल्ताफ सरवर आत्तार (वय २३, रा. पुळा, जि. कामारेड्डी), योगेश उत्तम पांचाळ (वय २६, रा. पुळा, जि. कामारेड्डी, तेलंगणा), तौफीक अग्रफ शेख (वय २३, रा. जालना, सध्या मुक्काम पुणे - मुख्य सूत्रधार

नांदेड जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी ऑनलाईन पैसे स्वीकारल्यानंतर त्या बदल्यात कोणालाही रोख रक्कम देऊ नये. आपली फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या क्रमांकावर किंवा .. वर तक्रार नोंदवावी."
-अबिनाश कुमार, पोलिस अधीक्षक, नांदेड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT