nanded news
दोन गावठी कट्यांसह चौघांना अटक; ४ काडतुसांसह कार जप्त  pudhari photo
नांदेड

नांदेड : दोन गावठी कट्यांसह चौघांना अटक; ४ काडतुसांसह कार जप्त

नांदेड : दोन गावठी कट्यांसह चौघांना अटक; ४ काडतुसांसह कार जप्त

पुढारी वृत्तसेवा

नांदेड, पुढारी वृत्तसेवा पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांच्या ऑपरेशन प्ल्श आऊट अंतर्गत जिल्ह्यात गुन्हेगारांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दि.११ ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत दोन गावठी कट्टे, चार जिवंत काडतूस आणि गुन्ह्यात वापरण्यात वापरलेले चारचाकी वाहन जप्त केले आहे.

पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्ल्श आऊट राबविण्यात येत आहे. आजवर जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांना गज आड करण्यात आलेले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांचे पथक शुक्रवारी दि.११ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास शहरातील आसना भागात गस्तीवर होते. दरम्यान, अर्धापूर तालुक्यातील पार्डीजवळच्या टोलनाक्यावर गावठी पिस्टल घेऊन चार जण एका स्वीफ्ट डीझायर कार मध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार स्थागुशाच्या पथकाने नियोजित स्थळी छापा मारून आरोपी माधव आनंतराव नंदनकर (वय २६) व्यवसाय व्यापार पानपट्टीचालक रा. शिवनगर महाराणा प्रतापचौक, नांदेड, आकाश अनंतराव साखरे (वय २५) व्यवसाय चालक रा. सिंचन नगर स्वंयवर मंगल कार्यालय, छत्रपती चौक, नांदेड, चंद्रमुणी मारोती कांबळे (वय २३) व्यवसाय बेकार रा. जूनी आबादी मुदखेड आणि प्रतीक एकनाथ गोरे (वय ३५) व्यवसाय चालक रा. आंब्याच्या झाडाजवळ सिद्धार्थ नगर, चैतन्य नगर, नांदेड यांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांचाकडून दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस तसेच एक स्वीफ्ट डीझायर चार चाकी वाहन (एमएच ३८ जे ३१३२) असा ३,४५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस कॉन्स्टेबल बालाजी कदम यांच्या फिर्यादीवरून आरोपी माधव आनंतराव नंदनकर, आकाश अनंतराव साखरे, चंद्रमुणी मारोती कांबळे आणि प्रतिक एकनाथ गोरे यांच्या विरोधात अर्धापूर ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३/२५, सह कलम १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर अधिक तपासासाठी आरोपींना अर्धापूर पोलिसांकडे देण्यात आले.

पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरख व खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, पोऊनि साईनाथ पुयड, अंमलदार गंगाधर कदम, विलास कदम, बालाजी कदम, संतोष बेलुरोड, संदीप घोगरे, तिरुपती तेलंग, घेवारे, अकबर पठाण, सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राजू सिटीकर यांनी ही कारवाई पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.