माजी आमदार प्रदिप नाईक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन File Photo
नांदेड

माजी आमदार प्रदिप नाईक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

"किनवट माहूर तालुक्यावर शोककळा; संयमी नेता हरवला..!"

पुढारी वृत्तसेवा

वाई बाजार, पुढारी वृत्तसेवा

किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदिप नाईक यांचे आज हैद्राबाद येथे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही दुर्दैवी घटना नववर्षाच्या पहाटे घडली असून, या घटनेने संपुर्ण किनवट माहूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

आज दि. १ जानेवारी २०२५ रोजी किनवट विधानसभेवर सलग तीन पंचवार्षिका अधिराज्य गाजवलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे माजी आमदार प्रदिप नाईक यांचा आज पहाटे हैद्राबाद येथे त्यांच्या घरी झोपेत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि. २ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या मुळ गावी किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे अंत्‍यसंस्‍कार होणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेने संपुर्ण किनवट माहूर तालुक्यातील समस्त बंजारा समाजासोबत इतरही अठरापगड जातींचे नेतृत्व म्हणून प्रचलित असलेल्या या नेत्याच्या अन:पेक्षीत निधनाने दोन्ही तालुक्यावर शोककळा पसरली असून, संयमी, चाणाक्ष व दुरदृष्टीचा नेता हरवल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT