Family members' preference for online shopping has increased
अनिल पोरवाल
जवळा बाजार: सध्याच परिस्थितीत मोठ्याप्रमाणात ऑनलाईन खरेदीस सुविधा उपलब्ध होत असून ग्राहकास आवडी प्रमाणे वस्तू ऑनलाईन वर सुविधा निर्माण झाल्यामुळे लाखो रूपयांची गुंतवणूक करून मोठ्याप्रमाणात दुकान टाकून व्यवसाय करणारा मंडळीचा व्यवसाय मोठ्याप्रमाणात परिणाम होत असलेला पहावयास मिळत आहेत ग्राहकाचा ऑनलाईन खरेदीने व्यवसाय दुकानदार ऑफलाईन परिस्थितीती निर्माण झाली आहे. त्या मुळेच बाजार पेठ मोठ्याप्रमाणात परिणाम होत चालला आहे.
सर्व सामान्य व्यापारी वर्गाकडून आपला उदरनिर्वाह करण्यास लाखो रूपय बँक कर्ज काढून व्यवसाय सुरू करण्यात येत आहेत तर मोठ्या व्यापारी वर्गाना ऑनलाईन खरेदीने मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहेत ऑनलाईन खरेदीस ग्रामीण भागात सुध्दा मोठ्याप्रमाणात वाढ होत चालली आहे आता घरोघरी सर्व सामान्य, श्रीमंत कुटुंबातील मंडळीत ऑनलाईन दैनंदिन जीवनातील सर्व वस्तु खरेदीचा कौल वाढत चालला आहे तर तरूणी व महिलावर्ग सौंदर्य प्रसाधन साहित्य व सर्व सुविधा खरेदीस ऑनलाईन मोठ्याप्रमाणात वाढ होत असून त्याचा बाजार पेठ मोठ्याप्रमाणात व्यवसायावर परिणाम होत चालला आहे.
आज सुध्दा बाजारपेठ मध्ये दसरा, दिपावली, पाडवा, ईद अदि विविध सणाचा वेळेस ग्राहकास आकर्षित करण्यासाठी व्यापारी वर्गाकडून विविध स्कीम डिस्काउंट व कुपन आकर्षक बक्षीस ठेवण्यात येत असून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत पण ऑनलाईन खरेदीस सुध्दा डिस्काउंट देण्यास विविध कंपनी स्पर्धा निर्माण झाली तर ग्रामीण भागात एकाच ठिकाणी सर्व खरेदीस मॉल मोठ्याप्रमाणात लाखो रूपय खर्च करून उभारण्यात येत आहेत पण ग्राहकास ऑनलाईन खरेदीस कौल मात्र वाढ होत आहे पण सध्याच परिस्थितीत तरूण तरूणी कुटुंबातील आपल्या परिवार सणाचा वेळेस लागणारे कपडे तर घर सजावट सर्व साहित्य दैनंदिन जीवनातील लागणारा वस्तु सुध्दा ऑनलाईन खरेदी करीत आहेत.
कलर साईज आपल्यास घरीच सुविधा उपलब्ध होत असून जर पसंत नाही पडला तर ऑनलाईन परत पाठवून बारा तास आता ऑनलाईन खरेदीचे पेमेंट खात्यावर जमा होत आहेत या मुळेच बाजार पेठ मध्ये फॅशनबल डिझाईन कपडे व ईतर साहीत्य खरेदी करण्यात येत असल्याने सणाचा वेळेस आठ दिवस बाजार पेठ मध्ये अफाट गर्दी पहावयास मिळत होती पण आता ऑनलाईनचा खरेदीने सण वेळेस बाजार पेठ गर्दी कमी होत चालली आहे.
एकंदरीतच सध्याच परिस्थितीत १० रूपय पासून हजारो रूपय पर्यंत खरेदी ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाली आहे ऑनलाईन खरेदीने मोठ्याप्रमाणात व्यापारी वर्गाचा व्यवसाय मोठ्याप्रमाणात परिणाम होत चालला आहे तर किरकोळ व्यवसाय करणारा व्यापारी वर्गाचा दररोजच खर्च किरायाभाडे नोकरीचा पगार निघत नसल्याने फार हाल निर्माण झाले आहेत सध्या तरी ऑनलाईन खरेदीस कुटुंबातील मंडळीत मोठ्याप्रमाणात कौल वाढत चाललाआहे. कुटुंबातील मंडळीकडून दसरा, दिपावली व विविध दैनंदिन वस्तु ऑनलाईन खरेदीस मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे.