Milk Production Pudhari
नांदेड

Milk Price Hike: महागाईचा भडका! दूध लिटरमागे १० रुपयांनी वाढले; ऐन सणासुदीत खिशाला कात्री

सणांची मांदियाळी : दुग्धजन्य पदार्थ, मिठाई महागण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

Family budget swells as milk price increases by Rs 10 per liter

नांदेड, पुढारी वृत्तसेवा ज्या दुधाशिवाय कोणाचाच दिवस सुरु होत नाही. त्या दुधाचे भाव १० ते १५ रुपये लिटरमागे वाढले आहेत. दि. १ ऑगस्टपासून सुटे दूध ८० रुपये प्रतिलिटर या दराने विक्री होत आहे. यामुळे महिन्याकाठी साधारणपणे ३०० रुपयांनी बजेट वाढले आहे. दुसरीकडे विविध कंपन्यांच्या पाकिटबंद दुधाला मात्र मागणी पटली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत ही भाववाढ झाल्याने दुग्धजन्य पदार्थ, मिठाईचे भाव वाढतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

देशभरात महागाईचे सत्र सुरु असून मंदीसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्याला विविध देशात सुरु असलेली युद्ध, बुद्धजन्य परिस्थिती तसेच भारत, अमेरिका विषडलेले संबंध कारणीभूत असावेत, इथपर्यंत चर्चा सर्वसामान्यांत ऐकायला मिळतात. सध्या पाचरतळा सुरू असून दळ णवळणात येणारा व्यत्यय हे सुद्धा एक प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. या वातावरणाचा फटका भाजीपाला उत्पादनाला सुद्धा असत असून काही भाज्यांचे दर वाढले आहेत.

दरम्यान, दुधाचे दर वाढणार अशी वर्षा मागील महिन्यात सुरु होती, ती खरी ठरली असून दि. १ ऑगस्टपासून सुट्या दुधात प्रतिलिटर १० रुपयांनी व्यढ झाली आहे. अर्थात महिन्याकाठी २०० रुपये कौटुंबिक बजेट विस्तारले आहे. पूर्वी ६० ते ७० रुपये लिटरचे दूब आता ८० रुपये लिटर या दराने विक्री होत आहे. नांदेड शहरात दररोज २ ते अडीच लाख लिटर विक्री होते. परिसरातील गायांसह रेल्वे मार्गावर असलेल्या उमरी, मुदेड या भागातून दूध उत्पादक नांदेड मधील खाजगी डेअरींना देतात.

जवळपासचे लहान उत्पादक घरोघर जाऊन दुधाचे वितरण करतात. काही उत्पादक छोट्या-मोठ्या हटिलांना दूध देतात तर काही जणांचे व्यवहार मिठाई निर्मात्यांबरोबर आहेत. पनीर व खवा उत्पादकांची संख्या सुद्धा मोठी आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर दधाचे उत्पादन होत नाही. मग स्वाभाविक भेसळीचा शॉर्टकट अवलंवला जातो. त्याचे वेगवगेळे प्रकार असून देशी व संकरीत गाईचे दूध एकत्र केले जाते, म्हशीच्या दुधााला मागणी अधिक आहे. कारण त्यात फैट्सचे प्रमाण गाईच्या तुलनेत अधिक असते.

दुधात भेसळ होण्यापासून रोकण्याची कोणतीही यंत्रणा जागृत नाही. मध्यंतरी संभाजीनगर येथे सुट्या दुधाची जागेवरच तपासणी करण्यात आली. त्यावेळी ५० पैकी तब्बल ४९ नमुने सदोष आढळले. या दूध नमुन्यांमध्ये फैट व सॉलिड नॉन फॅट घटक कमी प्रमाणात होते. त्याचबरोचा साखर, युरिया आणि कॉस्टिक सोडा इत्यादी घटक आढळून आल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली होती.

कोरोनापासून सरकारी दूध संकलन बंद चव्हाण

छ. संभाजीनगर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश पहाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली होती. तशा पद्धतीची जागेवर तपासणी करण्याची यंत्रणा नांदेड येथेही कार्यान्वित होण्याची गरज आहे. दरम्यान, नांदेडमध्ये सरकारी दूध संकलन करण्याची यंत्रणा कोर ोनापासून बंद पडलेली आहे. जिल्ह्यात सहकारी दूध संस्थांची संख्या २५ आहे. परंतु त्या सर्वांचे कार्य बंद असल्याचे जिल्हा दुग्ध विकास अधिकारी अनिल घव्हाण यांनी सांगितले.

पाकिटबंद दुधाची मागणी घटली

नांदेडमध्ये शिवामृत, नॅचरल व अन्य कंपन्यांचे पाकिटवंद दूध साधारण ४५ ते ५० हजार लिटर दररोज येत होते. परंतु लोकांचा कल सैल किंवा सुट्या दुधाकटे बादला असून पाकिटबंद दुधात भेसळ होत असल्याच्या चर्चेने लोकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे लोकांशी चर्चा केल्यानंतर पुढे येते. सध्या दिवसाकाठी ३० ते ३५ हजार लिटर पाकिटबंद दूध नांदेडमध्ये येते, प्रामुख्याने हॉटेल चालक हे दूध वापरत असल्याचे दिसून येते. दरम्यान, या दुधाची सुद्धा अचानक तपासणी होण्याच्या प्रतिक्रिया आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT