bribe case
लाचप्रकरणी रोजगारसेवकाला अटक File Photo
नांदेड

नांदेड : पाच हजाराची लाच घेताना रोजगारसेवक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड,पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वडिलांच्या नावे गुरांच्या गोठ्याच्या मंजुरीसाठी पाच हजाराची लाच घेतल्याप्रकरणी बिटरगाव येथील रोजगार सेवकाला यवतमाळ येथील लाचलुचपतने सोमवारी (दि.८) अटक करण्यात आली. गजानन बद्रीसिंग रत्ने असे या रोजगार सेवकाचे नाव आहे.

बिटरगांव ग्रामपंचायत येथील ग्राम रोजगार सेवक गजाजन रत्ने याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार योजना अंतर्गत गुरांचा गोठा मंजुर करण्यासाठी तक्रारदाराकडे सात हजार लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती त्याला पाच हजार द्यायचे ठरले. यादरम्यान तक्रारदार यांना याप्रकरणी यवतमाळ येथील लाचलुचपत विभागात धाव घेत याची माहिती दिली. त्यानंतर हनुमान मंदिर परिसरात लाचलुचपतने तक्रार याने दिलेल्या माहितीनुसार सापळा रचला. त्यानंतर रोजगार सेवक रत्ने याला पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपतने पंचासमक्ष रंगेहाथ ताब्यात घेतले.

SCROLL FOR NEXT