Nanded Crime News : इन्स्टाग्रामवर शस्त्रांचे प्रदर्शन file photo
नांदेड

Nanded Crime News : इन्स्टाग्रामवर शस्त्रांचे प्रदर्शन

३५ इंची तलवारीसह एकाला बेड्या

पुढारी वृत्तसेवा

Display of weapons on Instagram

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडिया रिल्स आणि फोटोंच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचे फॅड सध्या तरुणाईमध्ये वाढत चालले आहे. मात्र, अशाच प्रकारे इन्स्टाग्रामवर शस्त्रांचे प्रदर्शन करणे एका २३ वर्षीय तरुणाला चांगलेच भोवले आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत या तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडून ३५ इंच लांबीची धारदार तलवार आणि हुबेहूब गावठी कट्टयासारखा दिसणारा लायटर जप्त केला आहे.

हनमंत ऊर्फ अविनाश किशन गजले (वय २३, रा. निळा ता. लोहा, ह.मु. गुंडेगाव, नांदेड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलिसांचे गुन्हे शोध पथक हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. हनमंत गजले हा तरुण आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हातात शस्त्रे घेतलेले फोटो अपलोड करून परिसरात दहशत निर्माण करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी वेळ न घालवता पंचांसमक्ष संशयिताची झडती घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT