Cricket Betting Pudhari
नांदेड

Cricket Betting: शहरात ऑनलाईन सट्टेबाजीचा प्रकार; पोलिसांनी छापा टाकून रंगे हात पकडलं

Anirudha Sankpal

Dharmabad Cricket Betting Racket:

धर्माबाद : पुढारी वृत्तसेवा

शहरात क्रिकेट सामन्याच्या नावाखाली मोबाईलवर सुरू असलेला ऑनलाइन सट्टेबाजीचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला बाभळी रस्त्यावर शनिवारी ता.(२८) रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून चौघांना रंगेहात पकडले.

मोबाईलवर व्हाट्सअप ग्रुप तयार करून क्रिकेट सामन्यावर बेकायदेशीर सट्टा लावणे इतरांकडून सट्टा स्वीकारणे असा प्रकार सुरू असल्याची माहिती गुप्त सूत्राकडून मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनिल नरसिमलू दलालवाड वय(३५ रा. रत्नाळी ता. धर्माबाद) साईनाथ उर्फ गड्डी सुरकुटवार, अंकुश निरावार आणि प्रमोद निरावार यांना ताब्यात घेण्यात आले.

या संशयीताकडून सुमारे दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला शहरात तरुणांना क्रिकेटच्या नावाखाली सट्टयाकडे वळविण्याचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

पोलीस कर्मचारी सचिन पडपवार यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक माधव लोणीकर करीत आहेत ऑनलाईन सट्टेबाजी विरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT