किनवट ः भारतबंदला पाठिंबा देऊन येथील माकपच्यावतीने केंद्र सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला. pudhari photo
नांदेड

Nanded News : किनवटमध्ये ‌‘भारत बंद‌’ला ‌‘माकप‌’चा पाठिंबा

अमेरिका-भारतामधील व्यापारी करार रद्द करण्याची माकपची मागणी

पुढारी वृत्तसेवा

किनवट : देशभरातील कामगार व शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या अखिल भारतीय औद्योगिक संप आणि ग्रामीण भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किनवट तालुका समितीच्या वतीने गुरुवारी (दि.12) राजमाता जिजाऊ चौकात निदर्शने करण्यात आली. विविध धोरणांविरोधात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत संपाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.

कॉ. अर्जुन आडे यांनी केंद्र सरकारवर कामगार व शेतकरीविरोधी धोरणे राबविल्याचा आरोप केला. 29 कामगार कायदे रद्द करून चार श्रम संहितांची अंमलबजावणी करण्यात आल्याने कामगारांचे हक्क कमी झाल्याची टीका त्यांनी केली. अमेरिकेसोबत करण्यात आलेला व्यापार करार भारतीय शेती, उद्योग व शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचे सांगत तो तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात आडेलू बोनगीर, शेवंता आडे, सुनीता बोनगीर, मनोज सलावार, नंदू मोडूकवार, शेख चांद, फरीद बाबा, रंगराव चव्हाण, सुदाम बर्गे, उत्तम वाघमारे, मोहन जाधव, महेमूद पठाण, अनिल आडे, नाथा बादड आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT