Confusion among farmers regarding sowing; Administration appeals not to rush
नांदेड, पुढारी वृत्तसेवा :
रविवारी सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला. परंतु या मुहूर्तावर पावसाने केवळ काही ठिकाणी हजेरी लावली. आज (सोमवारी) प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मे मध्ये पूर्व मौसमी पावसाने दाणादाण उडवल्यानंतर पावसाळ्यात वेळेवर वरुणर जाचे आगमन होईल व पेरणीची कामे आटोपतील या विश्वासावरील शेतकरी आता गोंधळात पडले आहेत.
मागील कित्येक वर्षात पूर्व मौसमी पाऊस यंदाच्या एवढा नियमित झाला नव्हता. वळिवाचा पाऊस म्हणून या पावसावर सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. यावर्षी मान्सूनचा प्रवास व आगमनही सुखावणारे होते. महाराष्ट्रात वेळेच्या आत मान्सून दाखल झाला. परंतु त्यानंतर मात्र त्याच्या प्रवासाला ब्रेक लागला. जून महिना उजाडल्यापासून पाऊस वेपत्ता झाला आहे. तुलनेने पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः पुणे, मुंबईत पावसाचे प्रमाण प्रचंड आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे.
मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच झड लावल्यामुळे शेतकऱ्यांनी युद्धपातळीवर पेरणीची तयारी केली. लग्रसराईतून स्वतः ला बाजूला करीत शेतकरी रात्रंदिवस शेतात राबताना दिसतो. एरवी में अखेर मशागतीला वेग येतो. परंतु यंदा मेच्या मध्यापासूनच अवेळी पावसाने जोर घरल्याने मशागतीची अंतिम टप्प्यातील कामे तशीच राहिली आहेत. यंदा पाऊस नियमित व सरासरीपेक्षा जास्त असल्याचे अंदाज ऐकून बळीराजा सुखावला होता. वियाणे खते खरेदी करुन झाली. परंतु आता मात्र पावसाने पाठ दाखवली आहे.
रविवारी (दि. ८) मृगनक्षत्राला सुरुवात झाली. त्यामुळे पाऊस आता नियमित होईल, अशी अपेक्षा होती. परंतु रात्री १० नंतर काही वेळ पावसाने नाममात्र हजेरी लावली. सोमवारी दिवसभर उकाडधाने लोक हैराण झाले होते. दिवसभर पोळणारे उन आणि उकाडा होता. पावसाचे दूरदूर पर्यंत नामोनिशाण नव्हते. शेतकरी मात्र आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. यंदा पेरणी लवकर करून मनाप्रमाणे आषाढी वारी करण्याचा बेत शेतकऱ्यांनी आखला आहे.
हवामान खात्याने जून महिन्यात अपे क्षेसारखा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेवर होता. पण पहिल्याच आठवड्यात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता बाढली आहे.
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर जिल्हातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करताना बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवली फक्त आता पावसाची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे हे साहित्य खरेदी करताना फसवणूक होणार नाही. शिवाय बोगस बी-बियाणे मिळणार नाहीत. याची दक्षता घेतली होती.
दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांना दिलासा देणारा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी लागवडीची घाई करू नये असे आवाहन यापूर्वीच कृषी विभागाने केले.