CIDCO police arrest two criminals
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी चोरी, घरफोडी या सारख्या गुन्ह्यातील दोघांना पकडण्यात सिडको पोलिसांनी यश आले आहे. दोघांना अत्यंत शिताफीने अटक करुन त्यांच्याकडून ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सिडको परिसरात गेल्या आठवड्यात चोरी, घरफोडीच्या तीन घटना घडल्या होत्या. पंकजनगर, हडको व मिल्लतनगर परिसरात घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यासाठी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक स्थापन करण्यात आले.
सुरुवातीला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची झाडा झडती घेतली. पण त्यातून यश आले नाही. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना एका खबऱ्याने माहिती दिल्यानंतर अब्दुल अफ ताव (२२) याला ताब्यात घेण्यात आले.
प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अब्दुल अफ ताब याला पोलिसी खाक्या दाखविताच याने साथीदारांची नावे सांगत तीन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी यानंतर महोमद आमेर उर्फ पप्पु (२३) याला अटक केली.
या दोघांकडून सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड व त्यांच्या टीमने ही कामगरी बजावली. वरिष्ठ पोलिसांनी यांचे कौतुक केले.