विशेष प्रतिनिधी
नांदेड ः विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीतील ही जागा राज्यातल्या महायुतीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला सुटणार हे जवळपास नक्की झाले असून या माहितीला या पक्षाच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्याने दुजोरा दिला.
पक्षाचा उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. भाजपातील ही घडामोड गुरुवारी दुपारी समोर आल्यानंतर या पक्षाच्या विरोधात इतर प्रमुख पक्षांची मोट बांधून एक उमेदवार देण्याच्या हालचालीही सुरू आहेत.
वरील निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गेल्या आठवड्यात सुरू झाली. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत सोमवारी (दि.1) दुपारपर्यंत आहे. आतापर्यंत प्रमुख इच्छुकांसह अनेक हौशी कार्यकर्त्यांनी अर्ज खरेदी केले असले, तरी भाजपाचे संभाव्य उमेदवार अमरनाथ राजूरकर, याच पक्षातील अन्य एक इच्छुक यांपैकी किंवा स्थानिक पातळीवर भाजपाच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तसेच काँग्रेस पक्षातर्फे कोणीही अर्ज दाखल केलेला नाही, असे दिसून आले.
शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा.डॉ.श्रीकांत शिंदे बुधवारी सायंकाळपासून नांदेड जिल्ह्यामध्ये होते. बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, शहराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे, माधव पावडे प्रभृतींनी खा.शिंदे यांची ते वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यांच्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्यासंदर्भाने चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने आदेश दिला, तर आमच्या पक्षाचा उमेदवार उभा केला जाईल, असे चिखलीकर यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
चिखलीकर यांचे पुत्र युवाचार्य प्रवीण यांनी निवडणूक अर्ज घेऊन ठेवला असल्याचेही समोर आले. वरील निवडणुकीसाठी भाजपा-मजपा व त्यांना मदत करू शकणाऱ्या एमआयएम या पक्षांच्या मतदारांचे संख्याबळ 197 आहे, तर स्थानिक पातळीवर या पक्षाच्या विरोधात असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, दोन्ही शिवसेना या पक्षांचे संख्याबळ सव्वादोनशेच्या पुढे असल्याचे दिसून येेते.
भाजपाच्या विरोधात सर्वांनी मिळून लढत दिली, तर त्यात यश येऊ शकते असे खा.श्रीकांत शिंदे यांना येथून सांगण्यात आले. मात्र अशा प्रकारची अनैसर्गिक आघाडी आकारास येऊ शकेल काय, याबद्दल मोठी साशंकता असल्याचे दिसून येते. काँग्रेसचे खासदार मागील पाच दिवसांपासून कौटुंबिक सहलीवर गेलेले आहेत. या पक्षाचे संख्याबळ 100च्या आसपास असूनही भाजपा विरोधात सक्षम उमेदवार देण्याच्या बाबतीत कुठलीही हालचाल नसल्याचे दिसून आले.
दर्जाहीन 29 महाविद्यालयांतील....
जनसंपर्क विभागाने गुरुवारी जाहीर केली. तत्पूर्वी 27 मे रोजी विद्यापीठ प्रशासनाने या संबंधीचे एक परिपत्रक सर्व महाविद्यालयांना पाठविले. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक आंकेक्षण तपासणीत 40 टक्क्यांपेक्षा कमी गुण व ‘फ’ दर्जा मिळाला, अशा महाविद्यालयांतील पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षांचे प्रवेश थांबविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
प्रवेश देण्यास मनाई घातलेल्या संबंधित महाविद्यालयांनी 2026-27 शैक्षणिक वर्षात पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच प्रवेश देऊन जे विद्यार्थ्यांचे नुकसान करतील त्यास संंबंधित महाविद्यालयाचे प्रशासन जबाबदार राहील, असेही संबंधितांना बजावण्यात आले आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या शैक्षणिक आंकेक्षण तपासणीतील 72 महाविद्यालयांपैकी 5 महाविद्यालयांना ‘ओ’ तर 11 महाविद्यालयांना ‘अ’ दर्जा मिळाला.
सर्वात खालच्या ‘एफ’ श्रेणीमध्ये 29 महाविद्यालये दिसून आली. या 29 महाविद्यालयांत सर्वाधिक महाविद्यालये नांदेड जिल्ह्यातील (18), लातूर जिल्ह्यातील (7) तर परभणी जिल्ह्यातील (4) महाविद्यालयांचा समावेश आहे. कुलगुरू डॉ.चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता डॉ.एम.के.पाटील यांनी दिलेल्या अहवालानंतर विद्या परिषदेच्या ठरावानुसार वरील निर्णय घेण्यात आला.
कारवाई पात्र महाविद्यालयांमध्ये खा.रवींद्र चव्हाण, माजी मंत्री कमलकिशोर कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेषराव चव्हाण, नानासाहेब जाधव या दिग्गजांसह काही नवीन शिक्षणसम्राटांच्या संस्थांचाही समावेश आहे. अशा सर्व महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘ॲफिलेशन’ या शीर्षकाखाली जाहीर केल्याचे उपकुलसचिवांनी कळविले आहे.
‘पीपल्स’च्या प्राचार्यपदी....
शैक्षणिक विश्वात चर्चेमध्ये राहिले. प्राचार्यपदासाठी आलेल्या अर्जांची छाननी संबंधित समितीने मार्च महिन्यातच केली होती. नंतर संस्थाचालकांनी घाईगडबड न करता प्राचार्यपदासाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांच्या मुलाखती 21 मे रोजी संबंधित समितीमार्फत आयोजित केल्या. निवड समितीने पात्र ठरवलेले एक प्राध्यापक मुलाखतीपूर्वीच सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा विषय संपुष्टात आला. प्रभारी प्राचार्य भानेगावकर हे पात्र असूनही मुलाखत देण्यास हजर राहिले नाहीत.
या पार्श्वभूमीवर निवड समितीने वरील पदासाठी प्रा.सुकाळे यांची निवड केली. डॉ.सुकाळे याच महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत होते. विद्यापीठात मानव्य विद्याशाखेचे ते सहायक अधिष्ठाता आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर या महाविद्यालयातील एक प्रलंबित विषय अखेर निकाली निघाला.
विधान परिषदेच्या इतर काही मतदारसंघांतील पेच सुटला नसल्यामुळे ज्या जागांवर वाद नाही, त्या जागांची घोषणाही अद्याप होऊ शकली नाही. भाजपाच्या उमेदवारांसंदर्भात मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष गुरुवारी दिल्लीमध्ये होते. या पक्षातर्फे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या नावाचा मोठा गाजावाजा झाला; पण पक्षातल्या काही मंडळींकडून खा.चव्हाण यांचे दुसरे निकटवर्ती किशोर मल्लिकार्जुन स्वामी यांचेही नाव पुढे केले असल्याचे सांगण्यात आले. या सगळ्यांना टाळून भाजपाने प्रणिता देवरे-चिखलीकर यांना उमेदवारी दिली, तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा बिनशर्त पाठिंबा मिळू शकतो, अशी योजना या पक्षाच्या एका जिल्हाध्यक्षाने मांडली.