FIle Photo Pudhari
नांदेड

ATS Raid | फुटबॉल क्लबच्या नावाखाली तरुणांचे ब्रेनवॉशिंग : पुसद, उमरखेडमधील काही तरुण देशविरोधी कारवाईमध्ये सक्रीय!

तपासातून गंभीर बाबी उघड, काही दिवसांपूर्वीच ATS ने छापा टाकून केली होती कारवाई

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड : गेल्या काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाने राज्यात अनेक ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेड या दोन ठिकाणी महाराष्ट्र ए टी एस ने मोठी कारवाई केली. यावेळी फुटबॉल क्लबच्या नावाखाली तरुणांचे ब्रेनवॉशिंग होत असल्याचे समोर आले.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुसद आणि उमरखेडमधील काही तरुण हे देशविरोधी कारवाईमध्ये सक्रीय सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच, फुटबॉलपटूंच्या मागून दहशतवादी कारवाया करण्याचा मोठा कट महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने उधळून लावला. दहशतवाद विरोधी पथकाच्या सर्तकतेमुळे दहशतवादी नेटवर्क उभे राहण्याआधीच मोठी कारवाई झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महराष्ट्र ए टी एस ने यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये एकूण 21 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड येथे 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी ATS ने मोठी कारवाई केली. उच्चशिक्षित तरुणांना अतिरेकी संघटनेत सहभागी करून घेण्याचा तसेच एक नवी दहशतवादी संघटना निर्माण करण्याचा काही जणांचा प्रयत्न होता. पण, ए टी एस ने केलेल्या कारवाईमुळे या संघटनेचा डाव उधळला गेला आहे. ए टी एस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वात सुमारे 20 पथके तैनात करण्यात आली होती. ही कारवाई गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. तरुणांना कट्टरतावादी विचारसरणीकडे ओढणे आणि नवीन दहशतवादी संघटना उभी करण्याचा प्रयत्न रोखणे मुख्य उद्देश होता.

फुटबॉल क्लबच्या आडून मोठा प्लान

पुसद, उमरखेड या भागात मोठ्या प्रमाणात फुटबॉल खेळाडू आहेत. फुटबॉलपटूंना देशाबाहेर पाठवून प्रशिक्षण देणे, वेगवेगळ्या खेळाडूंना देशाबाहेर पाठवून त्यांचे ब्रेनवॉश करुन त्यांना दहशतवादी कारवायांसाठी कसे वापरायचे? हा काही संघटनांचा प्लान होता, अशी माहिती देण्यात येत आहे. अहिल्यानगरमध्ये झालेल्या सर्च ऑपरेशनमध्ये या संदर्भातील पुरावे सापडले होते, त्यावरून मोठी कारवाई करण्यात आली.. आता याचा भांडा फोड झाला असला तरी,नेमके कोण कोण या कटात सहभागी होते. किंवा त्याचा म्होरक्या कोण? तसेच यांचे डावपेचाला कीती जण बळी पडले. याची माहीती अजुन गुलदस्त्यातच आहे. सर्व धागेदोरे जुळताच मोठा भांडा फोड व अटकसत्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT