Nanded Zilla Parishad Election pudhari photo
नांदेड

Nanded Zilla Parishad election : जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेत खा. अशोक चव्हाण राहणार का ?

कोअर कमिटीवरून कार्यकर्त्यांमधील संभ्रम वाढला

पुढारी वृत्तसेवा

रमेश पांडे

नांदेड : भारतीय जनता पक्षाने नुकत्याच जाहीर केलेल्या कोअर कमिटीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड महानगरातच जायबंद करून ठेवल्यामुळे नांदेड दक्षिण आणि उत्तर विभागातील त्यांचे विश्वासू कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेत खासदार चव्हाण राहणार की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यासाठी कोअर कमिटी जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. नांदेड जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असताना ही कमिटी जाहीर करण्यात आली. परंतु माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड महानगरासह ग्रामीण भागात दांडगा संपर्क असताना त्यांना नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या दोन्ही विभागातील कमिटीत स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यातील नगरपरिषदा, नांदेड महानगरपालिका, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच नांदेड विधान परिषद निवडणूक खासदार अशोक चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली झाली या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपल मोठे यश मिळाले. आता जिल्हा परिषट आणि पंचायत समितांच्या निवडणुकाह त्यांच्यात नेतृत्वाखाली लढवल्य जातील अशी शक्यता वर्तविली जात असतानाच महत्त्वाच्या समजल्य जाणाऱ्या नांदेड दक्षिण व उत्तर कोअन कमिटीतूनच चव्हाण यांना बाव करण्यामागे पक्षाचा हेतू काय? असाह प्रश्न उपस्थित होत आहे.

खासदार चव्हाण यांचे अनेक विश्वासू कार्यकर्ते जिल्हा परिषदेवन संधी मिळेल या प्रतीक्षेत आहेत. परंत प्रदेशाकडून त्यांचे अधिकार कर्म करण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्य चर्चामुळे कार्यकर्तेही सैरभैर होतान दिसत आहेत.

लोहा कंधारवर अन्याय

विशेष म्हणजे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात नऊ जिल्हा परिषद सर्कल असताना या मतदारसंघातून कोअर कमिटीवर कोणाचीही वर्णी लागली नाही. जिल्हा कार्यकारिणीवरही या मतदारसंघातून एकाही कार्यकर्त्याला महत्त्वाची जबाबदारी दिली गेली नाही. परिणामी कोअर कमिटी सदस्य निवडीपासून हा मतदारसंघ वंचित राहिला.

नजीकच्या काळात नांदेड महानगरात कोणत्याही निवडणुका नाहीत. असे असताना खासदार चव्हाण यांना कमिटीत महानगरापुरते मर्यादित ठेवण्यात आले याशिवाय ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा तीन टर्म पदभार सांभाळलेले राम पाटील रातोळीकर यांच्याही महानगर कोअर कमिटीत समावेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT