Loha Municipal Election NCP campaign
लोहा : शहराच्या विकासासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर प्रयत्नशील असतात. त्यांच्या नेतृत्वाखालील विकासाची जाणीव असणारे नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शरद पवार आणि दहा प्रभागातील २० उमेदवार यांना निवडून द्या. मी पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी उभा आहे. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि. २४) येथे दिले. लोहा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, या शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही. राज्याच्या तिजोरीची चावी आपल्या हाती आहेत लोहा वासीयांसाठी सदैव उपल्बध असणारे व शहराच्या विकासासाठी अग्रेसर असलेले शरद पवार यांना व दहा प्रभागातील २० उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. कोणत्याही मूलथापांना बळी पडू नका, आपल्या शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल.
आ. प्रताप पाटील यांनी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष व 20 उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. संचलन शहाजी पवार, बी डी . जाधव यांनी तर भास्कर पवार यांनी आभार मानले.
यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आ. मोहन अण्णा हंबर्डे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शरद पवार, तालुकाध्यक्ष छत्रपती स्वामी, तसेच उमेदवार केशवराव मुकदम , करिम शेख, दता वाले, छत्रपती धुतमल, भास्कर पवार, गणेश बगाडे, बालाजी खिल्लारे, सतीश निखाते आदीसह सर्व उमेदवार उपस्थित होते.
वासुदेवाच्या रूपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी गल्लोगल्ली जाऊन गीत गायन करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. वासुदेव गीत गायनातून केलेल्या या आवाहनाची चर्चा शहरभर होत आहे.