नांदेडच्या देळूबमध्ये एका - घरावर जमावाचा हल्ला pudhari photo
नांदेड

नांदेडच्या देळूबमध्ये एका - घरावर जमावाचा हल्ला

सरपंचासह ५९ जणांविरोधात गुन्हा दाखल; १६ जणांना केली पोलिसांनी अटक

पुढारी वृत्तसेवा

A mob attacked a house in Delub, Nanded

नांदेड, पुढारी वृत्तसेवा रस्त्यावर फळांचा कचरा टाकल्याच्या किरकोळ कारणावरून तसेच एक व्हिडिओ काढला म्हणून अर्धापूर तालुक्यातील देळुब बु. येथे एकाचा तरुणांसोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले.

प्रकरण एवढ्यावर थांबले नसून, बेकायदा जमावाने दगडफेक करत घरात घुसून सामानाची नासधूस केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि.२१) होती. अर्धापूर पोलिस ठाण्यात सरपंचासह ५९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील १६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विष्णुकांत कराळे यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून, चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावातील वातावरण शांत असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी म्हटले आहे.

चोख बंदोबस्तासह शांतता आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल आनंदराव बोंढारे (२४, रा. देळुब बु.) यांनी रस्त्यावर फळांचा कचरा का टाकला. या किरकोळ कारणावरून आरोपींनी त्यांना मशिदीसमोर बोलावून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर जमावाने सायकांळी बोंढारे याच्या घरावर जाऊन दगडफेक करत धुडघूस घातला. या प्रकरणात ५९ जणांना पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून १६ जणांना अटक केली. अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT