Natural Disaster Compensation Mukhed Taluka
मुखेड: मुखेड तालुक्यात मागील पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीत (वीज पडणे, अतिवृष्टीत नदी नाल्यातून, पुरातून वाहून जाणे) मृत झालेल्या १७ नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख प्रमाणे ६८ लाखांचा धनादेश वितरीत करण्यात आल्याची माहिती तहसिलदार राजेश जाधव यांनी आज (दि.२४) दिली.
तहसिल कार्यालयाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना हा निधी वाटप करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने मृतांच्या वारसांना ४ लाखांचा निधी देण्याची शासन तरतूद आहे. त्यानुसार वारसांना ही मदत दिली जाते. मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी तहसिल प्रशासन नेहमीच तत्पर असतो.