बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा
बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा  file photo
नांदेड

बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा

पुढारी वृत्तसेवा

बिलोली : सहा वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका आरोपीस जिल्हा न्यायधीश - १ तथा अति सत्र न्यायधीश बिलोली यांनी पोक्सो अंतर्गत २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या आरोपीचे नाव पवन इबितवार (२०, राहणार शांतीनगर देगलूर ) असे आहे.

बिलोली येथील मा. जिल्हा न्यायधीश -१ तथा अति सत्र न्यायधीश बिलोली दिनेश ए. कोठलीकर यांनी कलम ३७७, भा. द. वि. अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व रु.१०,०००/- दंडाची शिक्षा व रु.१०,०००/- दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा व कलम ५ (i), ६ पोक्सो अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व रु. १०,०००/- दंडाची शिक्षा व रु.१०,०००/- दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

घटनेची माहिती अशी की, मौजे शांतीनगर, देगलूर येथे दि. ६/१२/२०१९ रोजी पीडित बालिकेच्या चुलत बहीणीचा नवरा पवन उर्फ दशरथ पी. मारोती बोगडावारी/ईबीतवार याने तिला शौचास घेवून गेला. तेथील एका शाळेच्या पाठीमागे नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही गोष्ट कोणाला सांगू नकोस असे सांगितले. यानंतर पिडीत बालिकेला त्याने घरी आणून सोडले.

बालिकेला त्रास झाल्यामुळे आईला तिने घडलेली सर्व घटना सांगितला. यानंतर पिडीत मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुध्द कलम ३७७ भा.द.वि. आणि ३, ४, ५, (i) (M) (N), ६ पोक्सो, नुसार पो. स्टे. देगलूर येथे गुन्हा दाखल झाला. सदरिल गुन्हयाचा तपास एस. एम. परगेवार, सपोनि व पी. एम. सुर्यवंशी, पो. उप निरिक्षक यांनी पुर्ण करुन दोषारोप पत्र मा. अति. सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल केले.

सरकातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. व न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करुन तसेच सहाय्य्क सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राहय धरुन न्यायधीश दिनेश कोथळीकर यांनी दि. २७/०६/२०२४ रोजी शिक्षा ठोठावली. सरकातर्फे ॲड.संदीप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात पैरवी कर्मचारी पोलीस हेडकॉन्सटेबल माधव गंगाराम पाटील (ब. न. २४२३) पो. स्टे. देगलूर यांनी सहकार्य केले.

SCROLL FOR NEXT