अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास file photo
नांदेड

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास

पुढारी वृत्तसेवा

नांदेड, पुढारी वृत्तसेवा :अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास येथील पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र पांडे यांनी १० वर्षे सक्त मजुरी व रोख तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी हुलाजी भीमराव खांदाजे (वय २६, रा. राजेशनगर तरोडा नाका नांदेड) याने एका अल्पवयीन मुलीवर प्रेमाचे जाळे टाकत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता.

याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाग्यनगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी या प्रकरणात आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले.

न्यायालयाने या प्रकरणात सरकारतर्फे एकूण सात साक्षीदार तपासलेत. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करून तसेच अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनुराधा कोकाटे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश पांडे यांनी दहा वर्षे सक्त मजुरी व रोख तीन हजार रुपये दंडाची शिक्षा आरोपीला ठोठावली. सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अनुराधा कोकाटे यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार सादीक पटेल यांनी सहकार्य केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT