मराठवाडा

नांदेड : शाळेतून घरी जाताना अंगावर वीज पडल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू

मोहन कारंडे

धर्माबाद; पुढारी वृत्तसेवा : धर्माबाद येथे शाळेतून घरी जाण्यासाठी बसस्थानकाकडे जात असताना अंगावर वीज पडल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. स्वाती कामाजी आवरे (वय 15) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. ही घटना आज ( दि. २९) सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

धर्माबाद येथील कन्या शाळेत नववीच्या वर्गात व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वाती शिक्षण घेत होती. आज चारच्या सुमारास ती आयटीआय शाळेतून घरी जाण्यासाठी बसस्थानकाकडे जात असताना विजांचा कडकडाट व पाऊस सुरू होता. यावेळी अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. स्वातीसोबत तिची मैत्रीण होती. तिला कोणतीही दुखापत झालेली नाही. स्वातीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT