मराठवाडा

नांदेड : चारचाकी रसवंती गृहात घुसल्याने पाचजण जखमी, हदगाव-तामसा मार्गावरील घटना

backup backup

हदगाव; पुढारी वृत्तसेवा : चारचाकीने समोरच्या वाहनांना धडक देत रसवंती गृहामध्ये घुसल्याने पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि २५) दुपारी ४ वाजताच्या सुमारास हदगाव ते तामसा रस्त्यावर घडली. जखमींमध्ये नव दाम्पत्य समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबतच्या अधिक माहितीनुसार, तालुक्यातील तामसा ते तळेगांव फाटा दरम्यान दिनेश पवार यांचे रसवंतीगृह आहे. त्यांच्या एका नातेवाईकांचे वाहन या रसवंती गृहाच्या बाजूला उभे होते. यावेळी तामसाकडून हदगावकडे जाणाऱ्या चारचाकी (एम एच ०२ डी.डबल्यू ८१५७) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रसवंती गृहाजवळ उभ्या असलेल्या वाहनांना जोराची धडक दिली. या धडकेत वीस ते पंचवीस फूट घासत दोन्ही गाड्या रसवंतिगृहात घुसल्या. या अपघातात गाडीतील पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये नव दाम्पत्य असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने रसवंती गृहात बसलेल्या कोणत्याही नागरिकांना दुखापत झाली नसल्याचे समजते. जखमींना उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. या अपघातामुळे रसवंतीगृहातील मशीन, फ्रिज, लाकडी सामान व बाजूला असलेल्या पान टपरीचे मोठे नुकसान झाले आहे.

SCROLL FOR NEXT