मराठवाडा

Manavat Market Committee Election : मानवत बाजार समिती निवडणूक प्रचार शिगेला; तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?

backup backup

मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १० जून ला होत असलेल्या निवडणुकीमध्ये तालुक्यातील मातब्बर नेते उतरल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीत एकूण १८ जागेसाठी ३ पॅनल व अपक्ष उमेदवार मिळून एकूण ५९ उमेदवार रिंगणात उतरले असून या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत माजी सभापती पंकज आंबेगावकर व गंगाधर कदम यांनी शेतकरी विकास पॅनल च्या नावाखाली १८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत . त्यांच्या पॅनल मध्ये पंकज आंबेगावकर, सर्जेराव देशमुख, विश्वनाथ लाडाने, वैजनाथ पठाडे, वैशाली जाधव, गजानन घाटूळ, नारायण भिसे, संतोष लाडाने, सुरज काकडे, रामेश्वर जाधव, शिवाजी वरखडे, गीता यादव, सोमित्रा हिंगे, अंबादास तूपसंमुद्रे, अमोल कदम, जुगल काबरा, ज्ञानेश्वर मोरे, सोपान वाघमारे हे उमेदवार उभे आहेत.

काँग्रेसचे नेते व माजी संचालक कारभारी उर्फ बाबासाहेब आवचार यांच्या नेतृत्वाखाली इंद्रायणीदेवी शेतकरी बचाव पॅनल मध्ये ते स्वतः , माजी संचालक रामराव सुरवसे, सेनेचे दत्तात्रय जाधव , कालिंदा भिसे , पंचायत समिती माजी सभापती बंडू मुळे, अंजली लाडाने , सरस्वती रोकडे, गंगासागर चोखट, छाया मगर, गोपाळ जाधव, गणेश नाईक, द्वारकाबाई जाधव, किरण मगर, अनिता घनघाव व योगेश काळे यांचा सहभाग आहे . व्यापारी व हमाल व मापाडी मतदारसंघात त्यांनी उमेदवार उभा केला नाही .

बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पंडितराव चोखट व मदनराव लाडाने यांनीही बळीराजा परिवर्तन पॅनलमध्ये आकाश चोखट, आसाराम निर्मळ, रामेश्वर निर्वळ, अजय फुलारी, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष ऍड सतीश बारहाते, विशाल यादव , ऍड संतोष लाडाने , माधुरी कदम, जिल्हा परिषद सदस्य मीरा मांडे, चंदा सोनेकर, शेषराव जोरवर, परमेश्वर निर्वळ, सेनेचे कृष्णा शिंदे , संघपाल ठेंगे, मीरा सुरवसे, माजी नगराध्यक्ष महेश कोक्कर, ज्ञानेश्वर पुकाने व रंगनाथ वावरे यांचा समावेश आहे.

मतदारांच्या मनधरणीत गुंतले नेते

बाजार समितीच्या या निवडणुकीत एकूण १८ जागेसाठी ५९ उमेदवार उभे असून सहकारी संस्था मतदारसंघात ११ जागेसाठी ३८ उमेदवार उभे असून ४५१ मतदार संख्या आहे . ग्रामपंचायत मतदारसंघात एकूण ४ जागेसाठी १४ उमेदवार नशीब आजमावत असून ४१३ मतदार मतदान करणार आहेत . व्यापारी मतदारसंघात एकूण २ जागेसाठी ४ उमेदवार उभे असून २९२ मतदार आहेत . हमाल व मापारी मतदारसंघातील एक जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ३५२ मतदार मतदान करणार आहेत . या निवडणुकीत इतर निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्या कमी असल्याने प्रत्येक मतदारांना भेटण्याची सर्व पॅनल वाल्यांची कवायत सुरू झाली असून त्यांची मनधरणी सुरू झाली आहे.

अपक्षकांचाही प्रचार जोरात

या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवणुकीच्या रिंगणात उतरलेले महाराष्ट्र भाजपचे ओबीसी मोर्चाचे चिटणीस अनंत गोलाईत , माजी नगरसेवक ऍड किरण बारहाते व ऍड सुनील जाधव यांनी ही प्रचाराचा धुमधडाका सुरू केला आहे .

SCROLL FOR NEXT