बुलडाणा,पुढारी वृत्तसेवा : साहित्यिक, मुक्त पत्रकार आणि ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार (वय-54) यांचे फुफ्फूसाचे विकाराने रविवारी निधन झाले. गेल्या 4 महिन्यांपासून ते ऑक्सिजन सपोर्टवर होते. लांजेवार यांच्या अंतिम इच्छेनुसार वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचे देहदान केले जाणार आहे. साहित्यिक, सांस्कृतिक चळवळ, वाचनसंस्कृतीचा विकास तसेच बालसाहित्यात त्यांचे मोठे योगदान होते.
अभिव्यक्तीची क्षितीजे, साहित्य अभिव्यक्तीची स्पंदने, वाचू आनंदे मिळवू परमानंदे, कथांकूर, आमच्या गोष्टी, बालानुभव, बालकथा, एका ग्रंथपालाची कार्यशाळा, एकाच नाण्याच्या तीन बाजू, वाचन संस्कृती आक्षेप आणि अपेक्षा, शिक्षणावर बोलू काही, सल उकल आदी पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. लांजेवार यांचे विविध वृत्तपत्रातून शैक्षणिक संशोधन विषयक 200 हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.
हे ही वाचलं का