उसाच्या शेतात आल्यावरून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू file photo
लातूर

उसाच्या शेतात आल्यावरून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातील घटना; मयत मध्यप्रदेशातील

पुढारी वृत्तसेवा

Youth dies after being beaten over entering a sugarcane field

औसा / बेलकुंड, पुढारी वृतसेवा औसा तालुक्यातील वानवडा शिवारात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाच्या हत्येत झाले. उसाच्या फडात शौचास बसल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या शेतमालकाने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला, संदीप रामनाथ गौड (वय १९, रा. दुधोनिया, ता. हिलगाव, जि. सागर, मध्यप्रदेश) असे त्याचे नाव असून त्याच्यासोबत असलेला दुसरा युवक यशवंत ठाकूर हाही मारहाणीत जखमी झाला आहे.

या प्रकरणी या घटनेप्रकरणी राजेश हडवळे, व्यवस्थापक, ओनिक्या इन्फ्रा प्रा. लि., पुणे यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिस ठाण्यात बाळासाहेब वसंत माने (रा. वानवडा, ता. औसा) याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औसा-तुळजापूर महामार्गालगत वानवडा शिवारात सीएनजी गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. या कामासाठी मध्यप्रदेशातील काही मजूर येथे वास्तव्यास आहेत. गुरुवारी (दि.१८) सकाळी साडेसातच्या सुमारास संदीप गौंड हा शौचासाठी बाळासाहेब वसंत माने यांच्या उसाच्या शेतात गेला होता.

यावेळी शौचामुळे ठिबक सिंचनाच्या नळ्या वारंवार ब्लॉक होत असून संचही घाण होत असल्याचा आरोप करीत बाळासाहेब माने यांने संतापाच्या भरात संदीप गौड लाकडी दांडक्याने मारहाण केली. डोके व मानेजवळ जोरदार फटका बसल्याने संदीप जागीच कोसळून बेशुद्ध झाला. त्याच्यासोबत असलेल्या यशवंत ठाकुर यालाही मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमी अवस्थेतील संदीपला तत्काळ औसा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच औसा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. के. डमाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली असून हल्ल्यात वापरण्यात आलेले लाकडी दांडके जप्त करण्याची करण्यात आले आहे. पुढील तपास स.पो.नि. घायवट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT