Young Farmer Ends Life Nilanga Taluka
निलंगा: निलंगा तालुक्यातील आंबेगाव (मसलगा) येथील शेतकरी मच्छिंद्र गोरोबा सुरवसे (वय ३८) यांने नापिकीला कंटाळून शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही घटना बुधवारी (दि.२५) रात्री उघड झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मच्छिंद्र यांना एकत्रित कुटुंबातील अंबुलगा मेन शिवारातील सर्व्हे नंबर २८ मध्ये ७ एकर जमीन आहे. त्यांच्या वाटणीला २ एकर जमीन येते. आज सकाळी घटनेची माहिती मिळताच गावाचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन आदीसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती तलाठी व पोलिसांना देण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.