accident news (File Photo)
लातूर

Latur Accident : मालट्रकला कारची धडक, एक ठार, तीन गंभीर

अपघातग्रस्त कारमधील व्यक्ती एकाच कुटुंबातील

पुढारी वृत्तसेवा

जळकोट ः नांदेड - जळकोट - उदगीर राष्ट्रीय महामार्गावर जळकोट शहरातील महात्मा फुले चौका लगत उभ्या असलेल्या एका नादुरुस्त मालट्रकला मागून येणारी कार धडकल्याने एक महिला ठार झाली, तर तीन गंभीर जखमी झाले. मंगळवारी (दि.4) हा अपघात झाला. नांदेडहून कर्नाटक राज्यात एका नातेवाइकाच्या अंत्यविधीला जात असताना कारमध्ये स्वार व्यक्तींवर काळाने घाला घातला. अपघातग्रस्त कारमधील व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत.

कारमधील धुपताबाई बस्वराज सूर्यवंशी या ठार झाल्या, तर बस्वराज रावण सूर्यवंशी, गणेश बस्वराज सूर्यवंशी व वर्षा श्रीकांत म्हेत्रे सर्व रा. शिवनगर, नांदेड हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी उदगीर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना लातूर येथे हलविण्यात आले आहे.

कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट ट्रकच्या मागील बाजूस आदळली व आत घुसली. धडकेची तीवता इतकी होती मोठी की, या धडकेचा मोठा आवाज दूरवर ऐकायला मिळाला. या धडकेने कारचा पत्रा कापून निघाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT