Latur News : स्कूल बसचे योग्यता प्रमाणपत्र कोण तपासणार? File photo
लातूर

Latur News : स्कूल बसचे योग्यता प्रमाणपत्र कोण तपासणार?

पाल्यांची काळजी आहे ? उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळते योग्यता प्रमाणपत्र

पुढारी वृत्तसेवा

Who will check the school bus's fitness certificate?

जावेद शेख

उदगीर : तालुक्यातील सीबीएससी पॅटर्नच्या शाळा १० जून पासून तर मराठी माध्यमाच्या शाळा १६ जून पासून सुरू झाल्या आहेत विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी बस व त्यांचा उपयोग केला जातो मात्र बरेच वाहनचालक व मालक प्रादेशिक परिवहन कार्याकडून योग्यता प्रमाणपत्र घेत नाहीत हे विद्यार्थ्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र असेल तरच स्कूल बस मधून पाल्य पाठवा असे आवहान परिवहन प्रशासनाकडून पालकांना करण्यात आले आहे.

शाळा सुरू होण्याआधी दरवर्षी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि वाहनांची तपासणी केली जाते. स्कूल बस चालकांनी दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करणे आवश्यक्य असते. तालुक्यात १६६ स्कूल बसेसची नोंद आहे शासनाचे नियम हितासाठीच आहेत मुलाच्या सुरक्षित प्रवासासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने जारी केलेल्या सर्व नियमाचे पालन करून वाहतूक करावी अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली.

मागच्या वर्षात १२१ स्कूल बस मधून ८६ स्कूल बसची तपासणी केली असता त्यातील बऱ्यापैकी स्कूल बसला योग्यता प्रमाणपत्र नसल्यामुळे ४४ हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला, विद्यार्थ्यांचा अवैद्य प्रवास होत असल्याचे पुढे आले आहे खाजगी शाळा मधील सुमारे ४५% विद्यार्थी स्कूल बस ३० टक्के विद्यार्थी स्कूल व्हॅन तर दहा टक्के विद्यार्थी ऑटो रिक्षामध्ये प्रवास करतात. उन्हाळी सुट्टीच्या कालावधी मध्ये फेर तपासणी करण्याबाबत परिवहन विभागाच्या सूचना आहेत परंतु स्कूलबस च्या फिटनेसला घेऊन स्कूल बस मालक व स्कूल संचालक ही गंभीर नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आम्ही स्कूल बस चालकावर विश्वास ठेवून पाठवतो त्यामुळे नियमाचे पालन करूनच मुलाची वाहतूक करावी शासनाने हे प्रमाणपत्र प्रत्येकाला बंधनकारक केले आहे त्यासाठी शाळा व्यवस्थापन स्कूल बस संदर्भात नियमाचे पालन करणे गरजेचे असते, स्कूल बस मुलांना शाळेत नेण्यासाठी अनुकूल आहे की नाही हे तपासणी गरजेचे आहे शहर व ग्रामीण भागातील स्कूल चालकाकडून वाहतूक नियमाचे धिंडोळे काढले जात आहे, स्कूल बस मधून विद्यार्थ्यांचा अवैध्य प्रवास करवत असल्यामुळे त्यांना आरटीओने समज देणे गरजेचे आहे,

स्कूल बस वाहन चालकांना योग्यता प्रमाणपत्र आवश्यक असते हे मला माहितीच नाही हे मुलाच्या सुरक्षेसाठी असेल तर प्रत्येक चालकाने प्रमाणपत्र घेतले पाहिजे पालकांनीही यावर जागृत राहावे
-शिवकांत मुळे, पालक
स्कूल बस आणि वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या नोंदणीकृत बस संख्या मोठी आहे त्यातील जागरूक पालक मालकांनी योग्यता प्रमाणपत्र घेतले मात्र याकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे दुर्लक्ष करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल,
- आशिष कुमार अय्यर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उदगीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT