उदगीर : उदगीर शहरावर उन्हाळ्याचा अक्षरश कहरच कोसळला असून आकाशातून अंगावर पडत असल्याची जाणीव नागरिकांना होत आहे. रखरखत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असून दुपारच्या वेळेस शहरातील रस्ते निर्मनुष्य पडलेले असतात नेहमी गजबजणाऱ्या बाजारपेठेतही शुकशुकाट असल्याचे चित्र पहायला मिळत आहे,
प्रकाश उष्णतेच्या झळामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याचे कळते कोल्ड्रिंक्स ज्यूस उसाचा रस तसेच इतर थंड पेय विक्रेत्याच्या दुकानावर दुपारी गर्दी नसते थंडपेयाची मागणी वाढण्याचा हंगाम असतानाच उलट बिकट परिस्थितीवर निर्माण झाल्याने व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत.
दरम्यान तापमानाचा पारा चढत चालल्याने पंखे कूलर आणि एसीचा वापर प्रचंड वाढला आहे त्यामुळे विजेवरील ताण वाढून वेळोवेळी कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने नागरिक विविध अडचणीचा सामना करत आहेत गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून ही समस्या प्रकर्षाने जाणवत असून दैनंदिन कामकाज विस्कळीत होत आहेत.
उष्णतेच्या झळा आणि विजेच्या समस्या दुहेरी ताण सहन करावा लागत आहे वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत, अशा वाढत्या उन्हाळ्यात वीज वितरण कंपनी वीज ग्राहकांना वेळेवर वीज देणे बंधनकारक असताना अनेक वेळेस वीज गेल्याचे पहावयास मिळत असून यामध्ये शहरातील नागरिकांची या वाढत्या उष्णतेमुळे जीवाची लाही लाही होताना पहावयास मिळत आहे.
या वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे शहरातील अनेक रस्ते दुपारच्या वेळेस शुकशुकाट झालेले दिसून येत असून दुपारच्या वेळेस शहरात भयाण उन्हाचा पारा वाढल्यामुळे बाजारपेठ थंड झाल्याचे दिसून येत आहे.